पिंपरी चिंचवडमध्ये ओमायक्राॅनच्या रूग्नाचा ह्रदयविकाराने मृत्यू

उपचारा दरम्यान करोनाची लक्षण आढळून आल्याने, करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटव्ह आला होता.

0

पिंपरी-चिंचवड , रयतसाक्षी: नायजेरिया तुन परतलेल्या पिंपरी-चिंचवड येथील ओमायक्रोन बाधीत. एका ५२ वर्षीय रूग्नाचा गुरूवारी (दि. ३०) ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचे सार्वजनिकआरोग्ययंत्रनेने जाहिर केले आहे.

कोरोना पाठोपाठ जगभरात थैमान घातलेल्या ओमायक्राॅन व्हायरसची भारतात झपाट्याने वाढती रूग्नसंख्या चिंतेचा विषय ठरत ‌आहे . विदेशातून राज्यात परतलेल्या रूग्नांचण्या , प्रतिबंधीत उपाय योजना राबविण्यात येत‌ आहेत. दरम्यान , पिंपरी-चिंचवड येथे एक ५२ वर्षीय व्यक्ती (दि.१२ )डिसेंबर रोजी नायजेरियामधून आल्यानंतर १७ डिसेंबर रोजी या व्यक्तीला हृदयाशी संबंधित त्रास सुरू झाला.

म्हणून या व्यक्तीस परदेशी रूग्णांसाठी राखीव असलेल्या भोसरी रुग्णालयात दाखल केलं गेलं होतं. त्यानंतर पुढील उपचारासाठी वायसीएम रूग्णालयातील रुबी एलकेअर कार्डियाक सेंटरमध्ये हलवण्यात आलं होतं. उपचारा दरम्यान करोनाची लक्षण आढळून आल्याने, करोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटव्ह आला होता.

त्यानंतर ओमायक्रॉनची देखील चाचणी केली गेली व हा रिपोर्ट येणे बाकी होते, दरम्यान या व्यक्तीच्या तब्येतीत सुधारणा देखील झाली होती. मात्र, २८ डिसेंबर रोजी पुन्हा हृदयविकाराचा दुसरा झटका आला आणि या व्यक्तीचा मृत्यू झाला. दरम्यान आजच्या NIV अहवालातून असे दिसून आले आहे की त्या व्यक्तीला ओमायक्रॉनची लागण झाली होती. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या दोन जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचेही समोर आले आहे. तर, पिंपरी-चिंचवडमध्ये आजपर्यंत २६ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे आढळून आले असून, या पैकी १५ रूग्ण ओमायक्रॉनमधून बरे झाले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.