नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विहिरीत पडलेल्या काळविटास सर्पराज्ञीकडून जीवदान

भटक्या कुत्र्याच्या पाठलागात पडले होते विहिरीत ;वन विभाग व सर्पराज्ञीनवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विहिरीत पडलेल्या काळविटास सर्पराज्ञीकडून जीवदानच्या संयुक्त प्रयत्नाला यश

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पळत असलेले काळवीट खालापुरी येथे विहिरीत पडले असल्याची बाब येथील शेतकरी सचिन परजने यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तात्काळ वन विभाग व सर्पराज्ञीशी संपर्क साधला . विहिरीत पडलेल्या काविटास नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला बाहेर काढण्यात वन विभाग व सर्पराज्ञीस यश आले.

तालुक्यातील खालापूरी येथे कुत्र्याच्या हल्ल्यापासून स्वरक्षणासाठी पळत असलेले काळवीट विहिरीत पडल्याची माहिती येथील शेतकरी सचिन परजने यांनी वन विभाग व सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात तात्काळ दिली. विभागीय वन अधिकारी सचिन कंद व वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पराज्ञी चे संचालक तथा वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे व वनरक्षक बद्रीनाथ परजने हे तात्काळ स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सोनवणे व परजने हे स्वतः विहिरीत उतरून त्या काळविटास विहिरीतून सुखरूप बाहेर काढले.

त्यानंतर त्याला काही दुखापत आहे का हे वन्यजीव अभ्यासक सिद्धार्थ सोनवणे यांनी पाहणी केली .त्यात कुठलीही दुखापत नसल्याने त्यास थोडा वेळ शांत होऊन नंतर ताबडतोब त्या निसर्गात सोडून देण्यात आले.

” तालुक्यातील खालापुरी, पाडळी,तागडगाव, खोकरमोह ,जांब ,रायमोह,दगडवाडी, या परिसरामध्ये काळवीटांसह इतर वन्यजीवांची संख्या खूप चांगल्या पद्धतीने आहे. मात्र या परिसरामध्ये सध्या भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असल्याने येथील वन्यजीवांना या भटक्या कुत्र्यांपासून मोठा त्रास होत आहे.”
सिद्धार्थ सोनवने (वन्यजीव अभ्यासक)

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.