केज मध्ये एकाच रात्रीत दोन धाडसी चोऱ्या

एक महिला गंभीर तर इतरांनाही मारहाण; नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिसांसमोर आव्हान

0

, रयतसाक्षी: शहरांमध्ये नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला दोन ठिकाणी चोरांनी जबरी व धाडसी चोर्‍या केल्या असून केवळ रोख रक्कम व सोनेच चोरले नाही तर संबंधित लोकांना मोठ्याप्रमाणावर मारहाण केल्याचे चित्र पहावयास मिळाले.

पहिल्या घटनेत केज शहरातील शिवाजीनगर भागातील भगवान जमाले यांच्या घरी रात्री दोनच्या दरम्यान लोखंडी गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, श्री जमाले यांच्या पत्नी सरस्वती जमाले यांनी बाहेरील आवाज ऐकून दरवाजा उघडला असता त्यांच्या डोक्यात लोखंडी गजाने मारहाण केली घरातील कपाटातील रोख रक्कम दागिने व इतर साहित्य घेउन पोबारा केला. सरस्वती जमाले यांच्या आरडाओरडा नंतर चोर अंधाराचा फायदा घेत पळून गेले.

यानंतर चोर शिवाजीनगर भागापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या खंडोबाचा माळ येथे गुंड वस्ती नावाच्या वस्तीवर गेले तेथे अशोक रामभाऊ गुंड यांच्या घराचा दरवाजा तोडून लोखंडी कपाटातील मंगळसूत्र, गंठण, झुंबर व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला

श्रीमती सरस्वती जमाने या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई या ठिकाणी पाठवण्यात आले आहे तर श्री अशोक गुंड हे किरकोळ जखमी झाल्याचे समजते

सदरील घटनेची माहिती मिळताच केज चे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत , सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री संतोष मिसळे यांनी घटनास्थळाला भेटी दिल्या व पुढील कार्यवाही करण्यासाठी सूचना करून चोरांचा माग काढण्यासाठी पोलिस पथके रवाना केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.