नांदेड झेडपी कर्मचा-यांची सेवाजेष्ठता यादी तयार

याद्या जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांना पहावयास मिळणार आहेत.

0

नांदेड, रयतसाक्षी: नांदेड जिल्हा परिषदेच्या सर्व संवर्गातील 11 हजार 606 कर्मचा-यांची प्राथमिक सेवाज्येष्ठता याद्या तयार करण्यात आल्‍याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांनी दिली आहे.

जिल्हा परिषदे अंतर्गत एकूण 11 विभाग असून यात 52 संवर्ग येतात. या सर्व संवर्गाची प्राथमिक सेवा जेष्ठता यादी पूर्ण करण्यात आली आहे. दिनांक 1 जानेवारी 2022 च्या परिस्थितीस अनुसरून ही सेवाज्येष्ठता यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्यांदाच 1 जानेवारी रोजी या याद्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. सदर याद्या जिल्हा परिषदेच्या www.zpnanded.in या संकेतस्थळावर कर्मचाऱ्यांना पहावयास मिळणार आहेत.

संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता यादीत काही आक्षेप, दुरुस्ती, त्रुटी किंवा हरकती असल्यास कार्यालय प्रमुखामार्फत हरकती जिल्हा परिषदेत सादर कराव्यात. त्यानुसार हरकती तथ्य असल्यास यात सुधारणा करण्यात येणार आहेत.

प्राथमिक सेवाज्येष्ठता याद्या तयार झाल्यामुळे पदोन्नती बाबतचे प्रश्न, भरती प्रक्रिया व कर्मचारी सेवेसंबंधी असलेले सर्व प्रश्न निकाली निघणार आहेत. प्राथमिक सेवा जेष्ठता याद्या वेळेत प्रसिद्ध केल्याबद्दल अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त करून जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले आहेत.
सदर ज्येष्ठता यादी तयार करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने विशेष परिश्रम घेतले आहेत. तसेच सर्व विभागाचे खातेप्रमुख यांनी देखील त्यांच्या विभागातील विवाह संवर्गातील ज्येष्ठता याद्या तयार केल्या आहेत.

 

असी आहे विभाग निहाय सेवा जेष्‍ठता
जिल्‍हा परिषदेच्‍या सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या वतीने 11 हजार 606 कर्मचा-यांची प्राथमिक सेवा ज्येष्ठता याद्या तयार करण्‍यात आलेल्‍या आहेत. विभाग निहाय सेवा जेष्‍ठता प्रमाणे- सामान्‍य प्रशासन विभागात सहाय्यक प्रशासन अधिकारी-24, कनिष्‍ठ प्रशासन अधिकारी- 43, वरिष्‍ठ सहाय्यक लिपिक- 124, कनिष्‍ठ सहाय्यक- 376, लघुलेखक उच्‍चश्रेणी- 1, लघुलेखक निम्‍नश्रेणी- 2, लघुटंकलेखक- 1, वाहन चालक- 41, परिचर- 692 असे एकूण 1 हजार 304 कर्मचा-यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत विभाग- विस्‍तार अधिकारी सांख्यिकी- 32, विस्‍तार अधिकारी- पंचायत व समाजकल्‍याण- 44, ग्राम विकास अधिकारी- 193, ग्रामसेवक- 798 असे एकूण या विभागत 1 हजार 67 कर्मचारी आहेत. महिला व बाल कल्‍याण विभागातील पर्यवेक्षिका पदाचे 83 कर्मचारी, वित्‍त विभागात एकूण 109 कर्मचारी असून यात सहाय्यक लेखा अधिकारी-28, कनिष्‍ठ लेखा अधिकारी-20 वरिष्‍ठ सहाय्यक लेखा- 37 व कनिष्‍ठ सहाय्यक लेखा- 24 चा समावेश आहे.

 

शिक्षण विभागातील 7 हजार 746 कर्मचा-यांची सेवा जेष्‍ठता यादी तयार करण्‍यात आली आहे. यात केंद्र प्रमुख- 54, विस्‍तार अधिकारी शिक्षण श्रेणी-2 चे 60, अराजपत्रित मुख्‍याध्‍यापक- 15, प्राथमिक शिक्षक- 6 हजार 874, पदोन्‍नत मुख्‍याध्‍यापक- 419, शारिरीक शिक्षक- 25, चित्रकला शिक्षक- 16, प्रयोगशाळा सहाय्यक म्‍हणून दोघांचा समावेश आहे. आरोग्‍य विभागातील औषध निर्माण अधिकारी- 81, आरोग्‍य सहाय्यक महिला- 66, आरोग्‍य सहाय्यक पुरुष- 128, आरोग्‍य सेवक पुरुष- 236, आरोग्‍य सेविका- 354, प्रयोग शाळा तंत्रज्ञ- 12, आरोग्‍य पर्यवेक्षक विस्‍तार- 30 व कुष्‍ठरोग तंत्रज्ञ पदाचे 10 कर्मचारी असे एकूण 917 कर्मचा-यांचा समावेश आहे.

बांधकाम विभागात 119 कर्मचा-यांचा समावेश असून यात कनिष्‍ठ अभियंता- 73, स्‍थापत्‍य अभियांत्रिकी सहाय्यक- 39, मुख्‍य आरेखक-1, कनिष्‍ठ आरेखक- 4, वरिष्‍ठ यांत्रिकी- 1, कनिष्‍ठ यांत्रिकी-1, पाणी पुरवठा विभागातील शाखा अभियंता, कनिष्‍ठ अभियंता असे एकूण 32 कर्मचारी आहेत.

 

कृषी विभातील 39 कर्मचा-यांची सेवाजेष्‍ठता यादी तयार करण्‍यात आली असून यात कृषी अधिकारी-5, विस्‍तार अधिकारी कृषीचे 34 कर्मचारी आहेत. तसेच पशुधन पर्यवेक्षक पदाच्‍या 93 तर वर्णोपचारक-64 कर्मचा-यांचा समावेश आहे. तसेच लघुपाटबंधारे विभागातील कनिष्‍ठ अभियंता पदाचे 8 कर्मचारी आहेत. जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच 1 जानेवारी रोजी सेवा जेष्ठता याद्या प्रसिद्ध होत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.