वक्फ बोर्डाची जमीन हडपल्या प्रकरणी बीडमध्ये चौथा गुन्हा दाखल

४०५ एकर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली असून पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले आहे.

0

बीड, रयतसाक्षी:वक्फ बोर्डची जमीन हडपल्या प्रकरणी, आष्टी तालुक्यात तीन गुन्हे दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता चौथा गुन्हा देखील दाखल झाला आहे. बीड शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली देवस्थानाला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. दर्ग्याची तब्बल ४०५ एकर जमीन बनावट दस्तऐवज बनवून, महसूल मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने भूमाफियांनी लाटली असून पुन्हा एकदा महसूल मधील भूमाफियांचे रॅकेट उघड झाले आहे.

 

जिल्हा वक्क बोर्ड अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून, मुस्लिम धार्मिक स्थळ दर्गा, जमीन गैर व्यवहार प्रकरणी उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव याच्यासह, १५ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांच्यासह भुमिअभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

 

खिदमतमास जमीन असताना बनावट दस्तावेज बनवून उपजिल्हाधिकारी आघाव याने मदतमास करून खालसा केली. शहरातील प्रसिद्ध शहेनशाहवली दर्गाची ७९६ एक्कर ३७ गुंठे जमीनी पैकी ४०५ एक्कर ५ गुंठे जमीन, बनावट दस्तावेज तयार करून खालसा केलीय.

 

भूमाफियांनी यामधील काही जमिनीवर प्लॉटिंग करून जमीन विकली असल्याचं देखील समोर आलं आहे. दरम्यान या जमिनीची किंमत कोट्यवधीच्या घरात असून या जमीनीमधून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने, तब्बल १५ कोटी रुपयांचा मावेजा शासन दरबारी पडून आहे. त्यामुळं आरोपी भूमाफियांनी हा मावेजा उचलण्यासाठी नामी शक्कल लढवली असल्याचं तक्रारीत म्हटलंय आहे.

दरम्यान या गुन्ह्यात उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील याच्यासह हबीबोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, रा.ह मु सिडको एन १२ प्लट नं.१४ औरंगाबाद सिडको, औरंगाबाद, रशीदोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी, कलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी , सलीमोद्दीन सरदारोद्दीन सिध्दीकी शफाक गाँस शेख अजमतुल्ला पि. रजाउल्ला सय्यद रा.झमझम कॉलनी, बीड, अजीज उस्मान कुरेशी, मुजाहिद पि. मुजीब शेख मामला मोमीनपुरा,महसुल साहय्यक खोड, महसुल साहय्यक मडंलीक, मंडळ अधिकारी पी.के.राख, तत्कालीन तलाठी हिंदोळे, पी एस.आंधळे तत्कालीन तहसिलदार व अभिलेख विभागातील महसुल अधिकारी या १५ जनांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.