कोरेगाव भिमा विजयस्तंभास आनुयायांचे अभिवादन

१८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला आहे .

0

रयतसाक्षी: कोरेगाव भीमा इथे आज २०४ वा शौर्य दिन साजरा होत आहे. या निमित्ताने कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला फुलांची सजावट करण्यात आलीय. आज या विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार आहे. आज दिवसभरात उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, नितीन राऊत, संजय बनसोडे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे मंत्री विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी पोहोचणार आहेत. १८१८ साली कोरेगाव भीमा इथे पेशव्यांच्या सैन्याविरुद्ध झालेल्या लढाईत गाजवलेल्या शौर्याबद्दल हा स्तंभ उभारण्यात आला आहे .

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरेगाव भीमा इथला इतिहास नव्या पिढीला प्रेरणा देणारा आहे. कोरेगाव भीमा इथल्या विजय स्तंभाचा विकास करण्यासाठी महाविकास आघाडीने निधी मंजुर केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील समिती त्यासाठी काम करेल. त्याचबरोबर तुळापूर आणि वढू इथल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला भव्य बनवले जाईल, असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, कोरोनाचा धोका वेगाने वाढतोय . चार दिवसांच्या अधिवेशनात दहा मंत्री आणि वीसहून अधिक आमदार कोरोना बाधित झालेत, असंही त्यांनी सांगितलं.

बैलगाडा शर्यत काल रात्री रद्द करण्याचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून घेण्यात आलाय. त्यामुळे सर्वांनी त्याचे पालन करावे. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही याची माहिती घ्यावी, असंही ते म्हणाले. राज्य कोरोना मुक्त करणे हा नवीन वर्षाचा संकल्प असेल. कोरेगाव- भीमा आणि वढू- तुळापूर इथले स्मारक या वर्षात उभारण्याचा संकल्प आहे, असंही ते म्हणाले.

अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जातेय, आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी
पुणे : प्रशासनाच्या नियोजनाबद्दल आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केली नाराजी. विजय स्तंभाच्या इथे आल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळते हा इतिहास प्रेरक आहे . टोलनाक्यावर अनुयायांना खासगी गाड्यांमधून उतरवले जात आहे. तिथून पुढे जवळपास 6 ते 7 किलोमीटर अंतर पायी चालावे लागत आहे. आंबेडकरी जनतेचे मोठे हाल होत आहेत . थेट विजय स्तंभापर्यंत वाहनांची सोय करणे अपेक्षित आहे.

भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद पुणे दौऱ्यावर, विजयस्तंभाला अभिवादन
भीम आर्मी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद ( रावण ) आज पुणे दौऱ्यावर आहेत . भीमा कोरेगावमध्ये जाऊन करणार विजयस्तंभाला अभिवादन यंदा भीम आर्मी संघटनेनं भीमा कोरेगावमध्ये सभा घेणार असल्याचं केलं होतं जाहीर मात्र सभा, मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली आहे. भीम आर्मी सभा घेणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. सकाळी दहा वाजता चंद्रशेखर आझाद यांच पुणे विमानतळावर आगमन झालं.

देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल
कोरेगाव भीमा इथं शौर्यदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी दाखल .शौर्य दिनाला यंदा २०४ वर्ष पूर्ण होत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंधासह हा शौर्यदिन साजरा होत आहे.

भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा, विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई
पुणे : भीमा कोरेगाव विजयस्तंभ अभिवादन सोहळा यंदाचं विजयस्तंभ शौर्य दिनाचं २०० वं वर्ष विजयस्तंभाला आकर्षक अशी रोषणाई रात्रीपासूनचं अनुयायी विजयस्तंभ अभिवादनासाठी कोरेगाव भीमात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह महत्वाच्या मंत्र्यांनी विजयस्तंभास अभिवादन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.