केज तालुक्यात कोवीड-१९ फिरते लसीकरण मोहीमेला सुरूवात

सोमवार (दि.३) पासून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लसीकरण होणार

0

केज, रयतसाक्षी:आरोग्य विभाग बीड व जिवीका हेल्थ केअर सेंटर च्या माध्यमातून कोवीड१९ लसीकरणाला गती देण्यासाठी केज सह तालुक्यात फिरते लसीकरणाला सुरूवात झाली आहे.

संपूर्ण नागरीकाचे लसीकरण उदीष्ट ठेऊन आरोग्य विभागाने फिरते लसीकरण मोहीम सुरू केली आहे.
हे पथक शहरातील मुख्य चौक, बसस्थानक व खेडेगावात जाऊन नागरीकांचे लसीकरण करत आहेत. त्यामुळे लसीकरणापासून वंचित नागरिकांना याचा चांगला फायदा होत आहे. केज मध्ये या मोहीमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

फिरते लसीकरण मोहीम पथकामध्ये केज येथील डॉ अजय बुदगुडे, स्टाफ नर्स सातपुते संध्या, राठोड अश्विनी तसेच गोविंद गांधले, उमेश इर्मले, वाहक सय्यद पाशा यांचा समावेश आहे.
केज बसस्थानक परिसरात विजय आरकडे व डॉ. अजय बुदगुडे यांच्या उपस्थितीत लसीकरणाला सुरुवात केली.

हे फिरते लसीकरण पथक यापुढेही सुरू राहणार असून ज्या भागात किंवा गावात लसीकरणापासून वंचित असणारे नागरिकांनी ९६८९४२१३०६ या मो. नं. वर डॉ अजय बुदगुडे यांच्याकडे संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे असे या पथकाकडून सांगण्यात आले आहे.

सोमवार (दि.३) पासून माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लसीकरण होणार असल्याने, शाळेने संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे असेही अवाहन या पथकाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.