भीमा कोरेगाव च्या लढाईचा इतिहास समतेचा विजय – डॉ. गोणारकर

नवी व्यवस्था नवा समाज निर्माण करण्यासाठी झटावे असे आवाहन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी आज केले.

0
  • नांदेड, रयतसाक्षी : भीमा कोरेगावच्या लढाईचा इतिहास म्हणजे समतेची आस असणाऱ्या लोकांचा विजय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेची चळवळ पुनरुज्जीवित करण्यासाठी पॅंथरची चळवळ सुरू करणे आवश्यक आहे, याचे नेतृत्व तरुणाने स्वीकारावे. नवी व्यवस्था नवा समाज निर्माण करण्यासाठी झटावे असे आवाहन डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी आज केले.

भिमा कोरेगाव स्मृती दिनाच्या औचित्याने नांदेड येथील रिपब्लिकन हक्क परिषदेच्या वतीने भीमा कोरेगाव स्मृति स्तंभास मानवंदना देण्यासाठी नांदेड येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पुतळ्याच्या प्रांगणात एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदावरून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिषदेचे आयोजक रमेश सोनाळे यांनी केले. भीमा कोरेगावचा हा लढा अस्मितेचा होता. या अस्मितेच्या लढ्याचे प्रतीक पाहण्यासाठी नांदेड परिसरातील लोकांना भीमा कोरेगावला जाणे शक्य होणार नाही अशांसाठी भीमा कोरेगावची प्रतिकृती उभारली आहे.

आंबेडकरी चळवळ टिकली पाहिजे. आंबेडकरी चळवळीचे अस्तित्व टिकवण्यासाठी हा कार्यक्रम आहे. रिपब्लिकन नेत्यांनी चळवळ विभाजीत करून टाकली. दोन, तीन माणसांचा पक्ष स्थापन होत आहे. ही चिंतेची बाब आहे असे सांगून स्वाभिमानाने जगा.

निळ्या सावली खाली या असे आवाहन प्रास्ताविकात रमेश सोनाळे यांनी केले. यावेळी प्रारंभी भदंत पय्याबोधींनी भीमा कोरेगाव लढाईचे सरसेनानी सिदनाथ महार यांचे बारावे वंशज मिलिंद राजाराम इनामदार, मंचावरील सहभागीच्या वतीने सावित्रीबाई व महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलित करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.

भदंत पय्याबोधी यांनी त्रिसरण पंचशील दिले. यावेळी भदंत पय्याबोधी यांना धम्म रत्न पुरस्कार, प्रदीप नागापूरकर, अंकुश सोनसळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, दशरथ लोहबंदे आणि सुखदेव चिखलीकर यांना रिपब्लिकन रत्न पुरस्कार, मधुकर गजभारे, रवींद्र वाघमारे , किरण चित्ते, रोहित गायकवाड, रामचंद्र जोंधळे यांना रिपब्लिकन मित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भीमा कोरेगावची प्रतिकृती असलेले सन्मानचिन्ह प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

 


पँथर नेते रमेश खंडागळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राज सोनाळे यांची कन्या सायली हिने मिलिंद ईनामदार यांचे काढलेले तैलचित्र त्यांना भेट म्हणून अर्पण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास ढवळे व सत्यपाल नरवाडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभिजीत सोनाळे, कुणाल सोनाळे, शुभम सोनाळे, राज सोनाळे आदींनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.