मंत्री नवाब मलिक हाजिर हो….

वाशिम जिल्हा न्यायालयाचे आदेश १३ डिसेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश

0

 

वाशीम, रयतसाक्षी : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना १३ डिसेंबर रोजी वाशीम जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. समीर वानखेडे यांचे चुलतभाऊ यांनी नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रासिटी कायद्यानुसार वाशिम पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी जातीचे खोटे प्रमाणपत्र नोकरी मिळविल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तसेच त्यांची नोकरी जाणार असल्याचेही वक्तव्य मलिकांनी केले होते. प्रत्यक्षात समीर वानखेडे यांच्यासह त्यांच्या नातेवाईंकाजवळ अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असल्याचा संजय वानखडे यांचा दावा आहे.

संजय वानखेडे हे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांचे चुलत भाऊ आहेत. त्यांनी वाशिम शहर पोलिसांत अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार केली आहे.

याचिकाकर्ते संजय वानखडे यांच्यावतीने ज्येष्ठ विधीज्ञ, अ‍ॅड. उदय देशमुख यांनी न्यायालयामध्ये जोरदार युक्तीवाद केला. वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने नवाब मलिक यांना दि.१३ डिसेंबर रोजी वाशिम न्यायालयात म्हणणे मांडण्यासाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणात नवाब मलिक त्यांची बाजू मांडण्यासाठी वाशिम न्यायालयात येणार असल्यामुळे जनतेचे या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.