ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीचे शुभारंभ

ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.

0

धर्माबाद , रयतसाक्षी: १५ ते १८ वयोगटातील मुला, मुलींना कोरोनाची लस देण्याची मोहीम दि.३ जानेवारी पासून सुरू झाली असून सदरील मोहीमेची सुरूवात सोमवारी येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या शुभहस्ते करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा ओमिक्राण व कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची वेळ येत असल्याचे चित्र दिसत असल्यामुळे खबरदारी उपाय म्हणून शासनानी १५ ते १८ वयोगटातील मुला, मुलींना कोरोनाची लस देण्याची सुरुवात दि.३ जानेवारी पासून केली आहे.सदरील मोहीमेची अंमलबजावणी येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांनी केली आहे.

सदरील मोहीमेचे शुभारंभ शहरातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांच्या शुभहस्ते सोमवारी सकाळी करण्यात आले आहे.यावेळी १६ वर्षीय अथर्व कृष्णा तिम्मापुरे या मुलास कोरोनाची लस देऊन सदरील मोहीमेची सुरूवात करण्यात आली आहे.यावेळी पारीचारीका सौ.यमुलवार , बहुभाषिक पञकार संघाचे अध्यक्ष कृष्णा तिम्मापुरे व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी १५ ते १८ वयोगटातील मुले व मुली कोरोना लस घेण्यासाठी उत्सुकता दाखवली असल्याचे चित्र दिसत आहे.धर्माबाद तालुक्यातील पालकांनी आपल्या १५ ते १८ वर्षाच्या वयोगटातील मुला, मुलींना कोरोनाची लस देण्याचे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.शेख एकबाल यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.