कर्नाटक सरकारचे महाराष्ट्राच्या सीमेवर कठोर निर्बंध, शेकडो प्रवाशांना फटका

महाराष्ट्रात ओमिक्रनसह करोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कर्नाटक सरकार सतर्क झाले असून बेळगावच्या सीमेवर कडक तपासणी केली जात आहे. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला आहे.

0

बेंगळुरू, रयतसाक्षी: देशात करोनाच्या रुग्णांची संख्या झटाप्याने वाढत आहे. यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांसह करोनाच्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रा मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने राज्यांच्या सीमेवरील तपासणी वाढवली असून कोठर पावलं उचलली आहेत. खासकरून महाराष्ट्राच्या सीमेवर अधिक खबरदारी घेण्यात येत आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले. कर्नाटकमध्ये अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही वाढून १० हजारांवर गेली आहे. बेंगळुरूत सर्वाधिक ८४ टक्के रुग्ण आहेत.
देशात गेल्या आठवड्यात करोनाच्या आणि ओमिक्रॉनच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. खासकरून महाराष्ट्रासह मुंबई रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. यामुळे महाराष्ट्राला लागून असलेल्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खासकरून मुंबईच्या थेट संपर्कात येणाऱ्या शहरांच्यी सीमांवर कडक दक्षता ठेवण्याच्या सूचना दिल्याचं मुख्यमंत्री बोम्मई यांनी बेळगाव विमानतळावर रविवारी सांगितलं. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत तसंच आरटी-पीसीआर चाचणीचा रिपोर्ट आहे, अशांना कर्नाटकमध्ये प्रवेश दिला जाईल, असे बोम्मई यांनी स्पष्ट केले.
फक्त बेळगावच्या सीमेवरच नाही, इतर महाराष्ट्राला लागून असलेल्या इतर चेकपोस्टवरही खबरदारीची कठोर पावलं उचलली गेली आहेत. विजयपूर जिल्ह्याच्या सीमेवर कडक दक्षता ठेवली जात आहे. विजयपूर जिल्ह्या ११ चेकपोस्ट आहेत. कडक सुरक्षेमुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागेल. पण यामागे बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यच्या सुरक्षेचा सरकारचा हेतू आहे, असे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले.
दरम्यान, कर्नाटक सरकारने सीमेवर कठोर पावलं उचलल्याने मुंबई आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या हजारो प्रवाशांना याचा फटका बसला आहे.

मुंबईहून बेंगळुरूला जाणाऱ्या अनेक बसेस परत पाठवल्याचं बोललं जात आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूरहून खासगी बसेसने जाणाऱ्या प्रवाशांची तपासी करण्यात येत आहे. या बसमध्ये आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट आणि दोन्ही डोस न घेतलेल्या नागरिकांना बसेसने परत पाठवण्यात येत आहे. कर्नाटक सीमेवर रात्री १३ बसेस महाराष्ट्रात पाठवण्यात आल्याचं बोललं जात आहे. यामुळे शेकडो प्रवासी अडचणीत आल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.