नगरपंचायतीच्या दुस-या टप्प्यातील चार प्रभागासाठी नामनिर्देशनपत्र दाखल

उमेदवारांनी सायंकाळपर्यंत आपले नानिर्देशनपत्र दाखल केल्याने कार्यालय परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते.

0

शिरूर का., पाटोदा, आष्टी, रयतसाक्षी: नगरपंचायत सार्वत्रीक निवडणूकीच्या दुस-या टप्प्याच्या शिरूर, पाटोदा, आष्टी च्या प्रत्येकी चार प्रभागातील सोमवारी दि. ३ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले. तहसील कार्यालयाच्या निवडणूक विभाकडे‌ विविध पक्ष, अपक्ष उमेदवारांनी सायंकाळपर्यंत आपले नानिर्देशनपत्र दाखल केल्याने कार्यालय परिसरास यात्रेचे स्वरूप आले होते.

नगरपंचायतीच्या सार्वत्रीक निवडणूकी घ्या एकून १७ पैकी १३‌ प्रभागाचे दि. २१ डिसेंबर २०२१ रोजी‌मतदान प्रक्रीया संपन्न झाली. दरम्यान, मा. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसी च्या राजकिय अरक्षण‌ स्थगिती निर्णयाच्या अंमलबजावणी प्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने‌ दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येकी चार प्रभागासाठी नागरिकांच्या सर्वसाधारण प्रवर्गातून नामनिर्देशनपत्र दाखल‌करण्याची सोमवार (दि.३) अंतिम‌ मुदत असल्याने‌‌ सकाळ पासूनच तहसील कार्यालयाच्या‌ आवारात विविध पक्ष, अपक्ष उमेदवार, सुचकांनी गर्दी केली होती .

निवडणूक जाहिर कार्यक्रमा नुसार सायंकाळ पर्यंत शिरूर का. – क्रमांक १, २,९,११ प्रभागासाठी एकून ३९ , पाटोदा-क्रमांक‌ २,४,६,९ प्रभागासाठी एकून ५७ तर आष्टी-क्रमांक ११,३,४,६ प्रभागासाठी एकून ६८ नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले.
दरम्यान १७ पैकी १३‌ जागेसाठी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेमध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, काॅंग्रेसह‌ अपक्ष उमेदवारांनी‌ निवडणूक रिंगणात आपले भवितव्य आजमावले.

तीनही नगरपंचायतीच्या एकून १७ पैकी १३ जागेच्या निवडणूकीमध्ये सुरवातीला भाजपा- राष्ट्रवादी अशी सरळ लढत शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरवून मोडीत काढली. शिवसेने पाठोपाठ काॅंग्रेसने सोईनुसार एक दोन उमैदवा उभे करत‌ मतदरांना पक्ष अस्तीत्वाची जानिव करून दिली . अपक्ष व ऐनवेळच्या पुरस्कृत उमेदवारांनी निवडणूक प्रचारात मुसंडी मारत‌ पक्षाचा गणिती आकडातला हातचा तुर्तास अदृष्य‌केला आहे.

कोणाचे पारडे किती जड हे निकालातुन समोर येणार असल्याने शहरवासीयांना निकालाची उत्सुकता लागली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.