रयत क्रांती संघटनेचा बडोदा बॅंकेवर आक्रोश मोर्चा

जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा धडकला.

0

मुखेड, रयतसाक्षी: तालुक्यातील बँक आँफ बडोदा शाखेकडुन दत्तक गावातील 1200 शेतकर्‍यांच्या पिक कर्जाच्या फाईली,गटशेतीचे अनुदान व शासकीय अनुदान शाखाधिकारी मकरंद कुलकर्णी यांनी वेळोवेळी निवेदन देवुनही जाणीवपुर्वक देण्यास टाळाटाळ केल्याने आज रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील ढोसणे यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश मोर्चा धडकला.

तालुक्यातीलयेवती,वसुर,तारदडा,धनज,जामखेड, पिपंळकुंठा, कुंद्राळ,पळसवाडी यासह अन्य दत्तक गावातील 1200 शेतकर्‍यांच्या पिक कर्जाचे फाईली बँकेने घेवुन पण शाखाधिकारी यांनी सात महिन्यापासुन हेलपाटे शेतकर्‍यांना मारायला सांगुन शाखेत शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणुक देत असल्याने यानंतर गटशेतीचे अनुदान जाणीवपुर्वक रोखल्याने त्यांची खदखद आज मोर्चातुन शेतकर्‍यांनी दाखवुन दिले. मोर्चाची सुरुवात कवटीकवार मिल पासुन बार्‍हाळी नाका ते डाँ.बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या व छञपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यास अभिवादन करुन तहसिल कार्यालयात जमुन तेथुन बँक आँफ बडोदा शाखेवर धडकला व शेतकर्‍यांचा तिव्र संताप व्यक्त करुन मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.

यावेळी डाँ.रणजीत काळे,जि.प.सदस्य दशरथराव लोहबंदे,रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पाडुंरंग शिंदे,नगरसेवक प्रा.विनोद आडेपवार,वैभव पाटील राजुरकर,संगीत जाधव,बालाजी जाधव,संजय पाटील,अविनाश पाटील,प्रदीप इंगोले,बजरंग पाटील यांनी मनोगते व्यक्त केले.यावेळी बँके समोर तहसिलदार व बँक बडोदा अमरावती रिजनल चे अधिकारी यांनी मोर्चाना ऊत्तर दिले.व शेतकर्‍यांनी बँकेचे शाखाधिकारी मकरंद कुलकर्णी यांच्या तक्रारीचा वागणुकीचा पाढाच अधिकार्‍यासमोर वाचला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.