योजना कामाच्या चौकशीसाठी कृषी कार्यालयासमोर उपोषण

शिरूर तालुका कृषी कार्यालयासमोर चक्क पत्रकारानेच उपोषण सुरू केले आहे.

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: कृषीउन्नतीसह शेतक-यांच्या कल्यानासाठी शासनस्तरावरून राबविण्यात येणा-या विविध योजनांमध्ये गैरव्यवहाराचा आरोप करत चौकशीच्या मागणीसाठी शिरूर तालुका कृषी कार्यालयासमोर चक्क पत्रकारानेच उपोषण सुरू केले आहे.

 

कृषीक्षेत्राला आधुनिक चालना देण्यासाठी शासनस्तरावरून शेतक-यांना सवलतीच्या दरात औजारांसह जलसंधारण, मृदसंधारण, सिंचनासाठी तालुका कृषी विभागा अंतर्गत राबविण्यात येणा-या विवध योजनांमध्ये २०१८ ते २०२१ या कालावधीत प्रशासनातील अधिकारी, कर्मचार्यांनी संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप पत्रकार अशोक जातात यांनी केला आहे.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वृक्ष लागवड उपक्रमाचा तालुक्यात पुरता बट्ट्याबोळ झाला आहे. सद्यस्थितीत माळरानावर वृक्षालागवडीचे शोधुनही अस्तीत्व दिसून येत नाही .खरिप व रब्बी हंगामासाठी गरजू शेतक-या ऐवजी मर्जीतल्या धनदांडग्या शेतक-यांना बी-बीयाने वाटपाचा लाभ देण्यात येत आहे. सुक्ष्म सिंचनासाठी महत्वकांक्षी ठरलेल्या शेततलाव नातेवाईक, मर्जीतल्या धनाढ्य शेतकर्यांच्या घशात घातल्याने गरीब , गरजू शेतकरी लाभाच्या प्रतिक्षेत आहेत.
शेतशिवारातील सिमेंट बंधारे, माती नाला बांध कामांच्या मर्जीतल्या कंत्राटदारांना खैराती दिल्याने दर्जाहिन कामे शोधुन सापडणे कठीण झाले आहेत.

 

हितचिंतक कंत्राटदार पोळ्याच्या उद्देशाने कार्यालयात अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेची कामे मजुरां ऐवजी चक्क यंत्राने करून अधिकारी कर्मचार्यांनी शासनाचं त्रासदायक निधी टाक्यात लूटल्याचा आरोप पत्रकार श्री. जायभाय यांनी केला आहे.

 

तालुका कृषी कार्यालयात अंतर्गत राबविण्यात आलेल्या विविध योजनांच्या कामांची समिती मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची‌ मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषी राज्यमंत्री दादा भुसे, यांच्यासह जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रकार श्री. जायभाय यांनी केली. या प्रकरणी ठोस कारवाईच्या मागणीसाठी पत्रकार अशोक जायभाय यांनी तालुका कृषी कार्यालया समोर मंगळवार (दि. ४) उपोषण सुरू केले आहे. आंदोलनास विविधस्तरातुन पाठींबा मिळत असल्याने प्रशासनात चांगलीच खळबळ उडाली आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.