ट्रकला स्कॉर्पिओ आडवी लावून ड्रायव्हरला मारहाण; हवेत गोळीबार

चंदनसावरगाव परासरात थरार; केज तालुक्यात खळबळ

0

केज, रयतसाक्षी: केज- अंबाजोगाई मार्गावर चंदनसावरगांव(ता. केज) परिसरात धावत्या ट्रकला स्कारपिओ (जिप) आडवी लाऊन ट्रक चालकास मारहाण करत यावेत गोळीबार केल्याच्या थरारक घटनेने तालुक्यात खळबळ‌उडाली आहे .

चंदन सावरगाव येथे केज- अंबाजोगाई मार्गावर मंगळवारी सकाळी ११:३० च्या दरम्यान अंकुश राठोड हा त्याच्या ताब्यातील ट्रक चालवीत असताना त्याला येथील बस स्टँडवर बाबा तुळशीराम पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे सर्व रा. कोदरी (ता. गंगाखेड) यांनी स्कॉर्पिओ गाडी क्र. (एम एच २२/ ए एम १०८३) आडवी लावून ट्रक अडविला.

ट्रक ड्रायव्हर अंकुश राठोड याला ते म्हणाले की, तुझ्याकडे गंगाखेड शुगर कारखान्याचे पैसे बाकी आहेत. तु कारखान्याला ट्रक व ऊसतोडणी मजुर पाठवले नाहीस. असे म्हणाले. तसेच आम्ही कारखान्या कडुन पैशे वसुलीचे काम करतो. तु आता कारखान्याचे तुझ्याकडील बाकी असलेले पैसे आम्हाला दे . असे म्हणाले. फिर्यादी अंकुश राठोड हा त्यांना म्हणाला की, आपण मी केलेल्या कामाचा हिशोब करू व नंतर बाकी उर्वरित पैसे तुम्हाला देतो.

असे म्हणताच अंकुश राठोड यास बाबा पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे या तिघांनी शिवीगाळ करून चापट बुक्याने मारहाण केली. तेंव्हा अंकुश राठोड याचे नातेवाईक भांडण सोडवण्यास आले. बाबा पोले त्यांना म्हणाला की, त्याच्याकडे पिस्तुल आहे. मी एकालाही जिवंत सोडणार नाही. असे म्हणुन त्याने त्याच्या जवळील पिस्तुल मधुन हवेत गोळीबार करून दहशत निर्माण केली.

या प्रकरणी अंकुश राठोड याच्या फिर्यादी वरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात बाबा पोले, बाबू टोम्पे आणि हनुमंत लटपटे या तिघांच्या विरुद्ध गु.र.नं. २/२०२२ भा.दं.वि. ३४१, ३२३, ५०४, ५०६, ३४ यासह भागात भारतीय हत्यार प्रतिबंधक कायदा ३/२५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी युसूफवडगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ संदीप दहीफळे हे तपास करीत आहेत.

“गोळीबार केलेले पिस्तुल परवाना असलेले :- चंदन सावरगाव येथे दुपारी ज्या पिस्तुल मधून बाबा पोले यांनी हवेत गोळीबार केले ते पिस्तुल अधिकृत परवाना असलेले आहे व त्याचे लायसन्स हजर केले आहे. मात्र त्याचा त्यांनी गैरवापर करून दहशत निर्माण केली.”

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.