शहरातील शारदानगरात युवकाचा भोसकून खून

खुनाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद; दुचाकीस्वार आरोपी फरार

0

नांदेड, रयतसाक्षी: शहरातील शारदानगर भागात आज दि. ५ जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास एका युवकाचा धारदार खंजरने भोसकून खून करण्यात आला आहे. घटनास्थळी पोहोचले असून आरोपी फरार झाले आहेत.

अर्धापूर तालुक्यातील शनिपार्डी येथील विशाल रमेश धुमाळ (वय २३वर्ष ) हा नांदेड येथील नवीन मोंढा येथे एका खाजगी फायनान्स कंपनीत गेल्या एक वर्षापासून कार्यरत आहे. नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून विशाल धुमाळ दुचाकीवरून निघाला असता शारदानगर भागात दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पाठलाग करून विशाल धुमाळ याच्यावर खंजरने हल्ला चढविला.

जखमी अवस्थेत आपला जीव वाचविण्यासाठी जिवाच्या आकांताने विशाल धुमाळ हा राज रेसिडेन्सीमध्ये घुसला. मात्र अतिरक्तस्राव झाल्याने जमिनीवर कोसळून त्याचा जागिच मृत्यू झाला. खंजरने वार करून खून करणारे तिन्ही आरोपी आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख, पोलीस निरीक्षक संजय ननावरे, स्थाशाचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करण्यात आला असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पथके रवाना करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.