एसटी संप : १६० कर्मचा-यांनी मागितले स्वेच्छा मरण

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे.

0

किनवट, रयतसाक्षी: किनवट आगारातील तीस कर्मचार्‍यांवर कार्यवाही केल्यानंतर कर्मचार्‍यांनी आता टोकाची भूमिका घेतली असून १६० कर्मचार्‍यांनी स्वेच्छा मरणाला सरकारकडे परवानगीसाठी पत्रव्यवहार केला आहे. सत्तर दिवसापासून आगार कर्मचाऱ्यांच्या आंदोलना दरम्यान एकाने जीवनयात्रा संपवली. जीवंत असूनही मरणयातना भोगण्यापेक्षा सरकारने मरणाला परवानगी दिलेली बरी, अशा उद्विग्न प्रतिक्रीया व्यक्त केल्या. आगारातील एकूण १६० कर्मचाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे.

एसटी महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचे मागील ७० दिवसापासून वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन सुरु आहे. दरम्यान राज्यसरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढीची मागणी काही अंशी पूर्ण केली परंतु विलिनीकरणाची मागणी सरकार साफ अमान्य केली.

एवढेच नाही तर किनवट आगारातील पंचवीस कर्मचाऱ्यांना प्रथम निलंबित केले आणि आता बडतर्फीच्या नोटिसा बजावल्या आहेत. तत्पुर्वीच याच आगारातील दोन कर्मचाऱ्यांवर थेट बदतर्फीची कार्यवाही केली. अशा तीस कर्मचारी कार्यवाहीचे शिकार झालेत. सरकार बळाचा वापर करून आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून होत आहे.

सहायक जिल्हाधिकार्‍यांमार्फत सरकारला पाठवलेल्या निवेदनावर किनवट आगारातील पंढरी कोंकेवाड, दत्ता पालेपवाड, संदीप गायकवाड, राजकिरण नेम्मानिवार, पी. सी. डवरे, गजानन चंद्रे, देवा कानोरे, डी. एम. दुधमल, व्ही. एन. पिटलेवाड, ए. एन. चव्हाण, टी. एस. ठाकूर, सुधाकर सलाम, एस. बी, जगताप, आर. आर. समर्थवाड, गजानन दासरवार, विजय दारलावार, बी. एम. सांगळे, आर. एस. जाधव, सीमा दस्तूरकर, ज्योती पडलवार, ज्योती कदम यांच्यासह १६० एसटी कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.