राष्ट्रपती उद्या रायगडावर, चोख पोलिस बंदोबस्त

रायगड भेटीसाठी राष्ट्रपती येत असल्याने पर्यटकांना ३ ते ७ तारखेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

0

रायगड, रयतसाक्षी: खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राष्ट्रपती कोविंद यांना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्या म्हणजेच सात डिसेंबरला रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. राष्ट्रपती हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते.

मात्र याला शिवप्रेमींनी तीव्र विरोध दर्शवल्यानंतर राष्ट्रपती रोप-वेने रायगडावर येणार आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या भेटीमुळे सुरक्षेच्या कारणामुळे ३ ते ७ डिसेंबरपर्यंत पर्यटकांना किल्ल्यावर येण्यास प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

चोख बंदोबस्त


रायगड भेटीसाठी राष्ट्रपती येत असल्याने पर्यटकांना ३ ते ७ तारखेपर्यंत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. पर्यटकांसाठीची रोप-वेची सुविधाही बंद ठेवण्यात आली आहे. प्रशासनाने पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधीच याबाबतचे आदेश जारी केले आहेत. राष्ट्रपतींच्या भेटीसाठी रायगडावर मोठ्या प्रमाणात लगबग सुरू आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगीताराजे छत्रपती यांनी रायगड किल्ल्यावरील तयारीची पाहणी केली.

होळीच्या माळावर उतरणार होते राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेलिकॉप्टरने होळीच्या माळावर उतरणार होते. त्यासाठी हेलिपॅडही तयार करण्यात आला होता. मात्र हॅलिकॉप्टर उतरताना किंवा उड्डाण घेताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर मोठ्या प्रमाणात धूळ आणि माती उडायची. त्यामुळे शिवप्रेमींनी १९९६ साली उपोषण केले. त्यानंतर हा हेलिपॅड काढून टाकण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.