घरफोडी करणारे अट्टल चोरटे जेरबंद; चोरीचे दहा कॉम्प्युटर्स जप्त

चोरट्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठवले आहे.

0

नांदेड, रयतसाक्षी: देगलुर नाका परिसरातील डॉ. झाकीर हुसेन उर्दु प्राथमिक व माध्यामिक हायस्कुल रहेमतनगर येथील चोरीला गेलेले कॉम्प्युटर लॅब मधील किंमती 10 कॉम्प्युटर सिस्टीम व गुन्ह्यात वापरलेली एक दुचाकी असा दीड लाख रुपयांचा ऐवज इतवारा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने जप्त केला. यावेळी चार चोरट्यांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत पाठवले आहे.

 

डॉ. झाकीर हुसेन उर्दु प्राथमिक व माध्यामिक हायस्कुल रहेमतनगर मुख्याध्यापक अब्दुल अजीज यांनी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन इतवारा येथे दि. 3 जानेवारी रोजी दिली होती. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरूध्द कलम 457, 380 भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपासकामी असद शेख पोलीस उप निरीक्षक यांचेकडे देण्यात आला होता.

 

उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे व पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली असद शेख पोलीस उप निरीक्षक यांनी डी. बी. पथकाचे कर्मचारी हबीब चाऊस, विक्रम वाकडे, ज्ञानेश्वर कलंदर यांचे सोबत जलद गतिने तपासाची चक्रे फिरवुन गुन्ह्यातील संशईत आरोपी मोहम्मद फेरोज मोहम्मद सलीम (वय 28) व्यवसाय फुलदुकानावर नौकरी, रा. बिलालनगर नांदेड, शेख आवेस शेख हाबीब (वय 24) व्यवसाय वेल्डिंग काम, रा. इकबलनगर नांदेड, मोहम्मद मुदसीर मोहम्मद फारुख (वय 21) व्यवसाय. आचारी, रा. रहेमतनगर नांदेड, शेख शोहेब शेख हबीब (वय 19) व्यवसाय पेन्टर काम, रा. मोहम्मदीया कॉलनी नांदेड यांना ताब्यात घेवुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्यांना दोन दिवासांची पोलीस कोठडी दिली होती, या दरम्यान आरोपींना विश्वासात घेवून केलेल्या कौशल्यपुर्ण तपासाने गुन्ह्यातील चोरीस गेलेले 10 कॉम्प्युटर सिस्टीम व गुन्हयात वापरलेली एक अॅक्टीवा स्कुटी असा एक लाख पन्नास हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

चोरीस गेलेला मुद्देमाल व आरोपी यांना उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिध्देश्वर भोरे व पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक असद शेख यांनी वेळेत आरोपींच्या मुसक्या आवळुन त्यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेले साहित्य जप्त करून केलेल्या उल्लेखनीय कामगीरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.