बीडच्या उपहारगृहात पोलिसांचा राडा ! तोडीपाणीवर प्रकरण मिटले !!

ग्राहकांना व मालकाला मारहाण केल्यावर वीस हजाराच्या तोडीपाणीवर हा विषय मिटला .

0

बीड, रयतसाक्षी: गेल्या दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला एसटी चा संप,त्यामुळे बंद झालेला धंदा,त्यात काही दिवसापासून सुरू केलेल्या एसटी स्टॅण्ड मधील उपहारगृहात गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर ठाण्याच्या एका पीएसआय ने चांगलाच राडा घातला.ग्राहकांना व मालकाला मारहाण केल्यावर वीस हजाराच्या तोडीपाणीवर हा विषय मिटला .

बीडच्या बसस्थानका परिसरात उडपी उपहारगृह आहे.गेल्या दोन अडीच महिन्यापासून संप सुरू असल्याने उपहारगृहात फारसे ग्राहक नाहीत.काही दिवसापासून संप काही प्रमाणात मिटला त्यामुळे उपहारगृह सुरू झाले.तब्बल दोन महिन्यांपासून उपहारगृह बंद असल्याने रुपयाचा धंदा नाही.नोकरांचे पगार करणे मुश्किल आहे.

दरम्यान गुरुवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे एक पीएसआय आपल्या काही लोकांना घेऊन उपहारगृहात गेले.या ठिकाणी त्यांनी दमदाटी करत घरगुती सिलेंडर चा वापर होत असल्याचे सांगितले. त्यानंतर उपहारगृहात असलेल्या मालकाला आणि काही ग्राहकांना मारहाण करत दहशत निर्माण केली.

एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर तब्बल वीस हजार रुपयांची तोडीपाणी करत प्रकरण मिटवण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.रेड च्या नावाखाली’ द रेड’ घालणाऱ्या अन तोडीपाणी करणाऱ्या या द राडे बाज पीएसआय वर पोलीस अधीक्षक कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पोलीस हे कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी असतात की कायद्याची भीती दाखवून तोडीपाणी करण्यासाठी अशी चर्चा या प्रकरणानंतर होऊ लागली आहे.आधीच संपामुळे व्यवसाय ठप्प झालेल्या कँटीन चालकाला तब्बल वीस हजार रुपयांना घाडण्या मागे या पोलिसांचा हेतू किती शुद्ध होता हे आता दिसू लागले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.