सोनु कल्याणकरवर हल्ला प्रकरणी सहाजन अटकेत

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

0

नांदेड, रयतसाक्षी: शहरातील श्रीनगर भागात दि. ११ ऑगस्ट २०२१ रोजीसोनु कल्याणकर याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. दरम्यान , या प्रकरणात स्थानिक गुन्हा शाखेला यश आले असून त्यांनी सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
दि.११ ऑगस्ट २०२१ रोजी रात्री ९:०० च्या सुमारास अनिकेत उर्फ सोनु अशोक कल्याणकर हा युवक आपल्या कार्यालयात बसला असतांना दोन जणांनी त्याच्यावर अग्नीशस्त्रातून हल्ला केला. सुदैवाने कांही हाणी झाली नाही. पण या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ३४ नुसार भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी पाठपुरावा करून या प्रकरणातील आरोपींची शोध मोहिम सुरूच ठेवली. या प्रकरणात गोळीबार करणारा आरोपी आशिष सपुरे हा आहे.

स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीस पथकाने अखेर बलप्रितसिंघ उर्फ आशीष नानकसिंघ सपुरे (२४), प्रितेश बाबूराव परघणे(२६), अफजल खान मुसा खान पठाण(३३) एस.टी.महामंडळ मेकॅनीक, रोहित मारोतराव इंगळे(२१), शुभम सिताराम चव्हाण (२९) लिपीक एस.टी महामंडळ, सुमित अशोक एमले (२०) अशा ६जणांना ताब्यात घेतले.

या प्रकरणातील आशिष सपुरे विरुध्द १९ सप्टेंबर रोजी देगलूर नाका परिसरात एक जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात जबरीचा गुन्हा ज्या ठिकाणी दाखवण्यात आला त्या पेक्षा मुळ लुटीचे ठिकाण हा एक जुगार अड्डा आहे. पण जुगार अड्‌ड्यात लुट झाली असे त्या गुन्हा क्रमांक ६६५/२०२१ मध्ये नमुद नाही.

अनिकेत उर्फ सोनु कल्याणकरवर हल्ला करणाऱ्या प्रकरणात दिनेश उर्फ निप्स जमदाडे, मुक्तेश्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे या दोघांचा शोध पोलीसांना अजून घ्यायचा आहे. सोनु कल्याणकरवर हल्ला केलेल्या प्रकरणात ताब्यात घेतलेल्या सहा जणांनाची प्रत्येकाची वेगवेगळी स्वतंत्र भुमिका आहे.

पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, सहाय्यक पेालीस निरिक्षक पांडूरंग भारती, पोलीस अंमलदार मोतीराम पवार, बजरंग बोडगे आणि तानाजी येळगे यांचे कौतुक केले आहे. या प्रकरणात अटक झालेला आशिष सपुरे याचे नाव २९ मार्च रोजी घडलेल्या पोलीसांवर हल्ला प्रकरणात सुध्दा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.