राज्याची ओमायक्रॉनचे चिंता वाढली; मुंबईत १७ संशयित

राज्यभरात ओमायक्राॅनचे आणखी संशयित रुग्ण असल्याची भिती

0

मुंबई, रयतसाक्षी: देशात कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचे पाच रुग्ण सापडले आहे. दिल्ली, मुंबई, कर्नाटकातील अनेक जणांचे अहवाल सीक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहे. डोंबिवलीतील मर्चेंट नेवीचे अभियंता यांचा अहवाल ओमायक्रॉन पॉझिटिव्ह आला आहे. हा राज्यातील पहिला रुग्ण आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ओमायक्रॉनचे १७ संशयित रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे.

ज्यात १३ प्रवाशी असून, चार जण त्यांच्या संपर्कात आले आहेत. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, त्यांचे अहवाल पुढील दोन-तीन दिवसात येणार आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबई संशयित १७ जण आढळले असून, आणखी एवढे संशयित राज्यातील विविध भागात आहे.

बीएमसी ने दिली धक्कादायक माहिती
मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आपल्याजवळ ३७६० विदेशी प्रवाशांची यादी आहे. हे सर्व जण हाय-रिस्क देशातून आलेले आहेत. ३७६० पैकी २७९४ प्रवाशांना ट्रेस करण्यात पालिकेला यश आले असून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दिल्लीत ओमायक्रॉनचे रुग्ण
बंगळुरू, मुंबई आणि जामनगर नंतर आता दिल्लीत ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितले की, बाधित हा टांझानियामधून आला होता. विमानतळावर तपासणी केल्यानंतर त्याला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे सांगण्यात आले.

त्याला दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापूर्वी शनिवारी गुजरातमधील जामनगरमध्ये ओमायक्रॉन संक्रमित आढळून आला होता. त्याच वेळी, मुंबई आणि बंगळुरूमधील ओमाय क्रॉनच्या प्रकरणांसह, देशात या प्रकाराचे एकूण पाच संक्रमित आढळले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.