हिंगोलीत अवैध वाळू वाहतुक करणारी दोन वाहनं पकडले

महसुलच्या पथकाची कारवाई; वाळूसाठा जप्त , वाळू माफियांचे धाबे दणाणले

0

हिंगोली, रयतसाक्षी: तालुक्यातील लिंबाळा मक्ता शिवारातील हिंगोली – औंढा रस्त्यावरून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारे टिपर महसूल विभागाच्या पथकाने आज दिनांक ८ जानेवारी रोजी पकडले. तसेच गारमाळ परिसरात पथकाने कारवाई करून ट्रॅक्टर व ३० ते ४० ब्रास वाळूसाठा जप्त केला‌ पथकाच्या या कारवाईमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गौण खनिजाची चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून वाळू माफिया वर धडक कारवाई करून गुन्हे दाखल केले जात आहेत. प्रशासनाच्या कारवाईला न जूमानता अवैध वाळू वाहतुक करणा-या हायवा व ट्रॅक्टर शनिवारी पहाटेच्या सुमारास उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी व त्यांच्या पथकाने पकडले.

दरम्यान, उपविभागीय अधिकारी हिंगोली उमाकांत पारधी तसेच मंडळअधिकारी खंदारे, तलाठी प्रदीप इंगोले, सय्यद अब्दुल, रवी इंगोले, सुरेश चौधरी, माधव भालेराव, वाबळे, देविदास इंगळे, अशोक केंद्रे, हर्षवर्धन गवई, भास्कर पांडे, पारीसकर आदींनी कारवाई करून दोन वाहनांसह वाळूसाठा जप्त केला.
प्रशासनाच्या धडक कारवायांमुळे जिल्ह्यातील वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली असून चोरट्या वाळू उपसा व वाहतुकीला आळा घालण्यासाठी महसुल प्रशासनाच्या विशेष पथकाच्या कारवाया सुरूच राहतील असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.