अंबाजोगाई लातूर बर्दापूर रोडवर  भीषण अपघात

एसटीच्या वाहकासह चौघांचा जागीच मृत्यू तर तेरा जखमी

0

केज, रयतसाक्षी: अंबाजोगाई- लातूर रोडवर बर्दापूर जवळील सायगाव नजीकच्या नंदगोपाल डेअरी जवळ ट्रक आणि एसटी बस यांचा भीषण अपघात चौघांचा जागीच मृत्यू झाला.

या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मध्ये वाहकाचा देखील समावेश आहे. अपघातात १) आदिल सलीम शेख (आंबजोगाई), २) चंद्रशेखर मधुकर पाटील (वाहक) (कांचनवाडी, औरंगाबाद), ३) नलिनी मुकुंदराव देशमुख, (ज्योतीनगर औरंगाबाद), ४) सादेक पटेल (राडी नगर लातूर) या चौघांचा मृत्यू झाला आहे तर जखमी मध्ये १) सुंदरराव ज्ञानोबा थोरात (पांगरी ता. धारूर), २) हरिनाथ रघुनाथ चव्‍हाण (लातूर),

३) अल्लाउद्दीन अमीर पठाण (निलंगा), ४)अरेमत तालीम पठाण (लातुर), ५) जियान फईम पठाण (लातुर), ६) भागवत निवृत्ती कांबळे (लातुर), ७) योगिता भगवंत कदम (लातुर), ८) दस्तगीर आयुब पठाण (निलंगा), ९) प्रशांत जनार्दन ठाकूर (शेंडी), १०) सुभाष भगवान गायकवाड ( पिंपळगाव), ११)आयान फईम पठाण (लातूर), १२)माधव नरसिंगराव पठारे (जालना)१३)बळीराम संभाजी कराड (खोडवा सावरगाव) यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.