कोरोनाची तिसरी लाट: पहिल्याच दिवशी आढळले तब्बल दिड लाख कोरोना रुग्ण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली तातडीची बैठक

0

रयतसाक्षी: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. तिसऱ्या लाटेत आज पहिल्यांदा 1.50 लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तात्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काही मोठे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात सध्या रुग्ण सक्रिय होण्याचे प्रमाण वाढले असून, पॉझिटिव्ह रेट हा 10 इतका आहे. त्यामुळे या बैठकीत लॉकडाऊन तसेच काही निर्बंध देखील लादले जाऊ शकतात.

देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत पहिल्यांदा रुग्ण संख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात गेल्या 24 तासात 1 लाख 59 हजार 424 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर 327 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आज 40000 पेक्षा जास्त कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात गेल्या 24 तासात 41 हजार रुग्ण
राज्यात गेल्या 24 तासात सर्वाधिक रुग्ण वाढ पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासात राज्यात 41 हजार 434 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यात आजपासून कठोर निर्बंध देखील लागू करण्यात आले आहेत.

शुक्रवारी आढळले होते 1.41 लाख रुग्ण
गेल्या 24 तासात देशात 1 लाख 59 हजार 424 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापुर्वी शुक्रवारी 1 लाख 41 हजार 986 रुग्ण आढळले होते. तर गुरुवारी 1 लाख 17 हजार 100 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. देशात आतापर्यंत 3.55 कोटी जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 3.44 कोटी जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील विविध भागात सध्या 5 लाख 84 हजार 580 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.