केज तालुक्यात युवतीचा विनयभंग

भावाची तत्परता; आरोपी फरार

0

रयतसाक्षी: आई-वडील बाहेरगावी गेल्याचा गैरफायदा घेत मध्यरात्री घरात घुसून एका १८ वर्षीय युवतीचा वाइट हेतूने हात धरून विनयभंग केला. भावाने तत्परतेने प्रतिकार करत पिडित युवतीची आरोपीच्या तावडीतुन सुटका केली. अंधाराचा फायदा घेउन आरोपी फरार झाले .

केज तालुक्यातील तांबवा येथील १२ विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या १८ वर्षीय युवतीचे वडील ड्रायवहार असून ते साखर कारखान्यावर बाहेगावी कामाला आहेत. शनिवारी (दि. ८) पिडीतेची आई कामानिमीत्त नातेवाईकाकडे बाहेरगावी गेले होती. घरी पिडीता व तीचा भाऊ दोघेच होते. त्यामुळे रात्री शेजारील नातेवाईकांना सोबत घेऊन घरात झोपले होते.
रविवारी पहाटे ३:०० घ्या दरम्यान पिडीतेचा भाऊ हा घराचा दरवाजा उघडून लघुशंकेसाठी गेल्याच गैरफायदा घेत गावातील अक्षय संतोष जंगम (कोल्हेवस्ती) हा घुसला. आरोपीने पिडीत युवतीचा वाईट हेतूने हात धरून वाइट हेतुने तिच्या अंगावरील कपडे फाडले. दरम्यान पिडीतेने प्रतिकार करत भावाला हाक मारली असता , आरोपी पिडीतेला म्हणाला ‘ तू मला होकार दे; नसता तिच्या भावाला जीवे मारून टाकेन, यावेळी पिडीतेच्या भावाने तत्परतेने आरोपींचा प्रतिकार केला. यादरम्यान अंधाराचा फायदा घेउन आरोपी शेजारच्या ज्वारीच्या शेतात पळून गेला. यावेळी आरोपी समवेत अज्ञात दोघे असल्याची माहिती पिडीतेने केज पोलिसांना दिली .
पीडित युवतीच्या फिर्यादी वरून केज पोलीस ठाण्यात अक्षय संतोष जंगम आणि त्याचे साथीदार यांच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.न. ४/२०२२ भा.दं. वि. ३५४ ३५४ (अ), ४५२, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाच्या महिला पोलीस नाईक रुक्मिणी पाचपिंडे या पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.