काळा पैसा पांढरा करण्यासाठी,सबसिडी लाटण्यासाठी सिट्रस कंपनी चालू केली होती काय ? – कॉ.गंगाधर गायकवाड यांचा सवाल

कंपनी व्यवस्थापकाने कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारा वर व आतील सूचना फलकावर नोटीस लावून कंपनी बंद करण्यात येत असल्याचे लेखी स्वरूपात घोषित केले.

0

नांदेड, रयतसाक्षी: कृष्णूर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत सिट्रस प्रोसेसिंग इंडिया प्रायवेट लिमिटेड नावाची संत्रा आणि मोसंबी ज्यूस उत्पादन करणारी कंपनी मोठा गाजावाजा करीत सन २००९ मध्ये जागा पाहणी करून कंपनी स्थापन करण्याचा ठराव पास केला. सन २०१३ मध्ये कंपनी उभारण्याचे काम सुरू केले वा प्रत्यक्षात सन २०१५ ला उत्पादन व विक्री कंपनीने सुरू केली. त्या कंपनीमध्ये सुरवातीला १०० कायम कामगार कामावर होते. नंतर संचालक मंडळाने एकतर्फी निर्णय घेऊन कामगारांची कपात सुरू केली. दि.२७ डिसेंबर २०२१ रोजी कंपनी व्यवस्थापकाने कंपनीच्या मुख्य प्रवेश द्वारा वर व आतील सूचना फलकावर नोटीस लावून कंपनी बंद करण्यात येत असल्याचे लेखी स्वरूपात घोषित केले. या सर्व प्रक्रियेमध्ये कंपनीतील काही यंत्रे हलविण्यात आली आहेत.

संकेतस्थळावर चौकशी केली असता उपरोक्त कंपनी स्थापन करण्यासाठी हजारो कोटी व सबसिडी चे रूपये खर्च केल्याचे समजते. सदर कंपनी चे क्षेत्रफळ पन्नास एकर असून त्या कंपनीमध्ये कंत्राटी कामगारासह सर्व मिळून सातशे ते आठशे कामगार काम करीत होते. त्या मध्ये बहुतांश कामगार हे स्थानिक भूमिपूत्र आहेत.

 

कंपनी व्यवस्थापनाने कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले असून कंपनी पूर्ववत चालू करून सर्व कामगारांना कामावर घ्यावे या मागणी साठी सीटू कामगार संघटनेच्या वतीने ४३ कायम कामगारांचे दि.१ जानेवारी पासून बेमुद्दत चक्री उपोषण सुरू केले आहे.

कामगार आयुक्त,कारखाना निरिक्षक व भविष्य निर्वाह निधी अधिकाऱ्यांच्या नाहरकत प्रमाण पत्रा शिवाय कंपनी बंद करता येत नाही असा कायदा असून संबंधित अधिकाऱ्यांनी थेट कारखाना बंद करण्याची परवानगी कशी काय दिली हे राज्याचे उद्योग मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासणे अवश्यक आहे.
दि. ९ जानेवारी रोजी सीटूचे नांदेड जिल्हा सरचिटणीस कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कृष्णूर औद्योगिक वसाहतीतील कंपनी मुख्य प्रवेशद्वारा समोर सुरू असलेल्या उपोषणास भेट दिली व नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार अशोक चव्हाण साहेबांनी लक्ष घालून स्थानिक भूमिपूत्रांचा रोजगार वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत कारण सन २००९ मध्ये मंत्री अशोक चव्हाण हे उद्योग मंत्री,मुख्यमंत्री होते व त्यांच्या कार्यकाळातच सिट्रस कंपनी सुरू करण्यात आली होती.

 

विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला इंडिया मेगा ॲग्रो अनाज लि.प्लॉट नं.डी.३ कृष्णूर एमआयडीसी येथील उघड झालेला अन्न धान्य घोटाळा घोटाळा करणारी कंपनी व सिट्रस प्रोसेसिंग इंडिया लिमिटेड कंपनी ह्या अगदी चिटकून म्हणजेच दोन्ही कंपन्यांची सामायिक भिंत आहे.
बहुतेक हजारो कोटी रूपये व हजारो कोटी ची सबसिडी लाटण्यासाठीच हा कारखाना स्थापन केला होता काय ? असा सवाल करून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उद्योग मंत्री व राज्यातील वरिष्ठ औद्योगिक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

सदरील कंपनी बंद करण्यामागे काय गौड बंगाल आहे हे शोधून सर्व कामगारांना न्याय देणे यासाठी तीव्र लढा उभारणार असल्याचे कॉ.गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
दि.१ जानेवारी पासून सुरू असलेल्या चक्री उपोषणात कॉ.गणपत मुंडकर,कॉ.संतोष जाधव सत्ते, गावकर , कॉ. भिमाशंकर सोनटके,कॉ.राहूल जूनागडे व कॉ.राहूल आढाव हे नेतृत्व करीत आहेत व या आंदोलनात सीटू संलग्न औरंगाबाद मजदूर युनियनच्या एकूण ४३ कामगारांनी सहभाग घेतला आहे.
गोदावरी ड्रग्ज लि.युनिट अध्यक्ष कॉ.साहेबराव पुपुलवाड व कॉ.शिवशंकर मोरे यांनी देखील कृष्णूर येथे भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.