जूनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलनाची हाक

अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यव्यापी आंदोलनाच्या पावित्र्यात

0

नांदेड रयतसाक्षी: सन२००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व शासकीय कर्मचायांना जूनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी यासाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ देशव्यापी आंदोलन उभारणार असून तशी घोषणा आज येथे शिक्षक संघाच्या कार्यकारीणीच्या सभेत संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदास बस्वदे यांनी केली.

शहरातील विजयनगर हनुमान मंदिर मंगल कार्यालयात जिल्हयातील शिक्षक पदाधिकार्यांची सभा जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांचे अध्यक्षतेखाली,राज्य संयुक्त सचिव दिलीप देवकांबळे,राज्यसंघटक चंद्रकांत मेकाले यांच्या प्रमुख उपस्थितीत सभाआयोजित करण्यात आली होती.

 

यासभेत २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करेपर्यंत देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच जिल्हा कार्यकरिणीचा आढावा, सर्व तालुकाध्यक्षांनी आपल्या तालूक्याचा आढावा दिला व शिक्षकांच्या प्रलंबीत प्रश्नावर चर्चा करण्यात आली.

निष्ठेने कार्यरत राहील्यास पदे चालून येतात- बस्वदे

देविदास बस्वदे यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. सत्कारास उत्तर देतांना कार्य निष्ठेने पार पाडल्यास पद ही आपोआप चालून येतात असे बस्वदे यांनी प्रतिपादन केले.

यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष देविदास बस्वदे यांचेसह महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शोभा माळवतकर यांना सेवापूर्ती बदल निरोप तसेच शिक्षक नेते एम.डी.सिरसाठ, श्रीमती रतन कराड यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्या बद्दल भारतीय संविधान ग्रंथ शाल व पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य संयुक्त चिटणीस दिलीप देवकांबळे,राज्यसंघटक चंद्रकांत मेकाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सभेस भागवत पाटील, राजू पाटील बावणे, विश्वांभर कागडे, नारायण पेरके,कार्याध्यक्ष सुधाकर थडके, सरचिटणीस प्रल्हाद राठोड,माणिक कदम,ओमप्रकाश बलदवा,रमेश पवार,जयवंत काळे,गंगाधर मावले,दत्तात्रय धात्रक,प्रभू सावंत, संतोष कदम, बालाजी कवटीकवार, भगवान चव्हाण, मुनेश शिरसीकर, ताणाजी कुट्टे,रत्नाकर सुरंगळीकर,ए.डी.पंदिलवाड,पी.डी. शिंदे, नरसिंग जाधव, शिवशंकर बोडके,विनायक चव्हाण

तुळशिराम केंद्रे, दादाराव पाटील वाकडे,संजीव मानकरी,रवि ढगे सुभाष पाईकराव,तालुकाध्यक्ष- हनुमंत जोगपेठे, मोहसीन पठाण, सुरेश बाराळे, मारोती गायकवाड,देविदास गोडगे, संजय गुडले, दादजवार,एम.टी.जाधव, व्ही.व्ही.कल्याणकर, गौस पिंजारी, गुलाब चौधरी, सखाहरी पांपटवार, रावसाहेब जाधव, श्रीधर पाटील यांचेसह जिल्हाभरातील असंख्य शिक्षकांची उपस्थिती होती.

सभेचे प्रास्ताविकातून सरचिटणीस प्रल्हाद राठोड यांनी सभेची भूमिका विषद केली;सूत्रसंचलन उदय देवकांबळे यांनी तर उपस्थितांचे आभार जी. टी. कदम यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.