आमदार कल्याणकर यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ

सुगाव - वाघी - ढोकी रस्त्यासाठी ११५ लक्ष रुपयांची मंजुर

0

नांदेड, रयतसाक्षी : उत्तर मतदार संघातील सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्याचे मजबुतीकरण , डांबरीकरणाच्या कामासाठी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी ३०-५४ अंतर्गत १०० लक्ष तर जिल्हा नियोजन मधून १५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेत त्यांनी रविवारी (दि.५ ) नारळ वाढवून कामाचा शुभारंभ केला .

उत्तर मतदार संघातील गाव-खेडे वाडी-वस्ती , तांडे-पाड्यांच विकासात्मक समन्वय साधण्याचे धेय्य धोरण आखत आमदार बालाजी कल्याणकर यांनी विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, उमेश मुंडे, तालुकाप्रमुख जयवंत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुगाव- वाघी-ढोकी रस्ता कामाचे भुमीपुजन करण्यात आले.

परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी नेहमीच अग्रेसर आमदार बालाजी कल्याणकर बांधावर जाऊन समस्यांची जाणिव करून घेत आहेत. शेतीमालाच्या वाहतुकीसह शेतकऱ्यांना शेतात ये-जा करण्यासाठी शिवाय रस्ते, पांदण रस्ते , गावजोड रस्त्यांचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचा विडा नांदेड उत्तराचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी उचलला आहे.

गेल्या आठवड्यात राहटी येथील खितपत पडलेला कॅनॉल रस्त्याचा प्रश्न देखील मार्गी लावला आहे. या रस्त्याचे काम प्रगतीपथावर आहे. त्याच प्रमाणे सुगाव – वाघी – ढोकी या तिन्ही गावांना जोडणारा अंतर्गत रस्त्यासाठी जिल्हा नियोजन मधून आमदार बालाजी कल्याणकर यांनी ३०-५४ अंतर्गत १०० लक्ष तर जिल्हा नियोजन समितीमधून पंधरा लक्ष असा एकूण ११५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला असून या कामाचा शुभारंभ देखील त्यांच्या हस्ते होत आहे.

परिसरातील जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकर्यांनी आमदार कल्याणकर यांचे कौतुक करत आभार मानले . यावेळी जिल्हा परिषदेचे घुटके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एस.बी. नरमीटवार, मयुर कांबळे, उपतालुका प्रमुख संतोष भारसावडे, सर्कल प्रमुख गणेश बोकारे, सरपंच अनिल शिंदे, उपसरपंच संतोष लोखंडे, शाखा प्रमुख आम्रत भारसावडे

पांडुरंग शिंदे, बालाजीराव शिंदे, प्रवक्ते माधव महाराज, दिपक भोसले, धनंजय पावडे, पंडीतराव भारसावाडे, पंडीतराव भोसले, दादाराव भोसले, देविदासराव भोसले, चंपतराव भारसावडे, व्यकंटराव भोसले, गुलाब गुब्रे, संतोष भोसले, दत्ता भोसले, नर्सीगं भोसले यांच्यासह आदीजण उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.