शिरूर मध्ये तिरंगी लढतीची चुरस

भाजपची प्रतीष्ठा , राष्ट्रवादीची कसोटी तर शिवसेनेचे कसब

0

शिरूर कासार , रयतसाक्षी: शिरूर कासारनगरपंचारयतीच्या सार्वत्रीक निवडणूकीचा दुस-या टप्प्यातील प्रचार रंगात आला आहे. चार जागेसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षाचे एकून बारा उमेदवार रिंगणात आहेत. पहिल्या टप्प्यातील १३ पैकी मोजक्या जागेवर शिसेनेने उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले असले तरी दुसर्या टप्याती चार जागेवर शिवसेनेने तुल्यबळाचे उमेदवार उभे केल्याने सर्वच प्रभागात तिरंगी लढतीची चुरस पहावयास मिळत आहे.

नगरपंचातीच्या सार्वत्रीक निवडणूकीसाठी जाहिर कार्यक्रमानुसार दुसर्या टप्प्यात चार जागेसाठी दि. १८ रोजी मतदान प्रक्रिया पार पडत आहे . पहिल्या टप्यात एकून १७ पैकी १३ जागेसाठी दि. २१ डिसेंबर मतदान प्रक्रिया पार पडली. उर्वरित चार जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी, शिवसेनेने उमेदवार रिंगणात उतरवले आहेत .
सुरवातीला सहज वाटणारी निवडणूक राष्ट्रवादीचे कसब आणि शिवसेनेच्या प्रवेशाने भाजपच्या प्रतिष्ठेची होत आहे . सुरवातीला भाजप- राष्ट्रवादी मध्ये सरळ वाटणारी लढत शिवसेनेच्या प्रवेशामुळे अटी तटीवर येऊन ठेपली आहे.

भाजपाने चार जागे पैकी तिन जागेवर विद्यमान नगरसेवकांच्या घरात उमेदवा-या दिल्या आहेत एका जागेवर नवख्या उमेदवारास संधी दिली आहे. राष्ट्रवादीने एका जागेच्या उमेदवारीचा हार विद्यमान नगरसेवकाच्या गळ्यात घातला असून उर्वरित तिन जागेवर नवख्यांना संधी दिली आहे. शिवसेनेने पहिल्या टप्यातील १३‌पैकी ८ जागांवर उमेदवार रिंगणात उतरवले होते. तर दुस-या टप्यातील चार अशा एकून १२ जागांवर नवख्या उमेदवारांना संधी दिली आहे .

पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेनंतर चार जागांसाठी तिन्ही पक्षामध्ये चुरस पहायला मिळत असली तरी चारही जागांवरील अपक्षांची उनीव कोणाच्या पथ्यावर हे निकाला नंतर समोर येणार आहे . तिनही पक्षांच्या उमेदवारांनी घर भेटीसह ध्वनिक्षेप, होर्डींग, झेंडे ,पत्रीकांवर भर दिल्याने प्रचारात रंगत वाढत आहे.

नणंद- भाऊजयी आमने सामने:
राजकारणाच्या सारीपाटावर बहिण- भाऊ, काका-पुतने प्रसंगी भाऊ-भाऊ, दिर- भाऊजयी अशा कौटुंबिक नात्यांना एकमेका विरोधात समोरासमोर लढल्याचा अनुभव नवा नसला तरी प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी- शिवसेनेच्या नणंद – भाऊजयी मधील लढत शिरूरकरांना अनुभवायला मिळत आहे.

प्रचारात कोरोनाचे विर्जन :
कोरोना-ओमायक्राॅनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने प्रतिबंधक उपाय योजनांच्या सक्षम आंमलबजावणीसाठी जिल्हाभरात जमाबंदीचे आदेश जारी केले आहेत. जमावबंदी आदेशामुळे प्रचारसभा , फेरीवर निर्बंध जारी झाल्याने उमेदवार, पक्षश्रेष्ठींना मतदारांच्या भेटींवर भर द्यावी लागत आहे . प्रचार रंगात आणणा-या सभा, फेरींना मुकावे लागल्याने निवडणूक प्रचारात कोरोनाचे विसर्जन पडल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.