शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीवर राजनंदिनी तळेकर हिने उमटवली मोहोर!

जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे.

0

आष्टी, रयतसाक्षी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे अंतर्गत 2020-21.या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आल्या होत्या. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये वसुंधरा विद्यालयाची विद्यार्थिनी राजनंदिनी बाळासाहेब तळेकर हिने यश मिळवत 250 गुणांसह जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे.

वसुंधरा विद्यालयातील अचूक नियोजन व गुरुजनांच्या मार्गदर्शनामुळे राजनंदिनी तळेकर हिने हे यश मिळवले आहे. मागील वर्षीच्या कोरोनाने विस्कळीत झालेल्या वातावरणातही मनोज धस यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने योग्य नियोजनाद्वारे विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. वर्गशिक्षक आकाश कांबळे यांनी केलेल्या मार्गदर्शनाचे आणि तळमळीचे हे श्रेय असल्याचे राजनंदिनी सांगते. आकाश कांबळे हे विद्यार्थीप्रिय व उपक्रम शील शिक्षक म्हणून सर्व परिचित आहेतच,शिवाय विद्यार्थ्यांचा शिक्षकांविषयी आदरभाव व यशस्विता गुरुजनांच्या कार्याला सर्वदूर पोहोचवत आहे,हे या निकालावरून स्पष्ट होत आहे .

तेजस्विनी व बाळासाहेब तळेकर या आदर्श शिक्षक दांपत्याची राजनंदिनी ही कन्या आहे.या अगोदरही तिने राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धा, राज्यस्तरीय मंथन परीक्षा मध्ये यश मिळवले आहे. जूनियर आय.ए.एस स्पर्धा, नवोदय स्पर्धा,विविध वक्तृत्व व निबंध,रांगोळी स्पर्धांमध्ये तिने आजपर्यंत अनेक बक्षिसे मिळवली आहेत.

अशा या गुणवंत विद्यार्थिनीचे शिष्यवृत्तीधारक झाल्याबद्दल संस्थाअध्यक्ष मनोज धस,गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव ,शिक्षण विस्ताराधिकारी अर्जुन गुंड,मु.अ.सीमा बोंदारडेे, वसुंधरा विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद,तसेच सुरेश पवार,मोहन जगताप,मारुती पठाडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.