बुद्ध सृष्टीच्या विकासासाठी धम्मदान

किर्ती महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. चे धम्मदान दिले.

0

केज, रयतसाक्षी: सेवा निवृत्तीच्या पैशातून बीड उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर अत्यंत देखणी अशी बुद्ध सृष्टी विकसीत करून त्यात अत्यंत भव्य दिव्य अशा बुद्ध मूर्तींची उभारणी केलेल्या त्रिवेणीताई कसबे-पोटभरे यांच्या सामाजिक कार्याने प्रेरित होऊन बुद्ध सृष्टीच्या उर्वरित कामाच्या विकासासाठी धम्म भगिनी आयु किर्ती महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. चे धम्मदान दिले आहे.

त्रिवेणी ताई कसबे पोटभरे यांनी अत्यंत कष्टाने आणि प्रचंड मेहनतीने त्यांना सेवा निवृत्ती नंतरच्या मिळालेल्या भविष्य निर्वाह निधी आणि उपदानाच्या रकमेतून स्वतःच्या भावी आयुष्याची चिंता बाजूला ठेऊन सुमारे १४ लक्ष रु. खर्च करून केज-कळंब रोड लगत भव्य अशी बुद्ध मुर्ती उभारली आहे. तेथे बुद्ध सृष्टी उभारली आहे. तेथे अत्यंत मनमोहक असे फुलझाडे, लॉन आणि बुद्धगया येथील बौद्धी वृक्षांची लागवड केली आहे.

तसेच अत्यंत रेखीव व आकर्षक असे सांचीच्या स्तूपाच्या समोर असलेल्या प्रवेशद्वाराची प्रतिकृती उभारून त्याला सोनेरी रंग दिला आहे. तेथे जाणाऱ्या येणाऱ्या ते प्रवेशद्वार हे सोनेरी असल्याचा आभास होतो. या ठिकाणी अद्याप भिक्खू निवास आणि धम्म हॉल व इतर सुख सुविधा याचे काम हे निधी अभावी रखडले आहे. या सर्व बाबीं व त्यासाठी आर्थिक नियोजन यासाठी धम्मभगिनी आयु. किर्तीताई महेंद्र कसबे यांनी ५० हजार रु. च्या धम्मदाना₹ त्रिवेणिताई कसबे पोटभरे यांच्या स्वाधीन केला. बुद्ध धम्मात सम्यक दान कशाला म्हणतात याचे स्वतः दाखवून दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.