नांदेडमध्ये लालपरीवर हल्ल्याचे सत्र

१२ तासात दोन हल्ले; विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालया समोरच लालपरीवर दगडफेक

0

नांदेड, रयतसाक्षी: शहरात सकाळी एक एस.टी.बस फोडल्यानंतर लालपरीवरचे कटकारस्थान थांबले नाही. सायंकाळी अवघ्या १२ तासात पुन्हा विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर एका लालपरीवर दगडफेक करण्यात आली. यामुळे एस.टी.बसवर हल्ला करणार्‍यांना कायद्याचा जरब नसल्याचे या घटनांवरुन दिसून येत आहे .

 

आज सकाळी विष्णुपूरी भागात एका एस.टी.महामंडळाच्या गाडीवर दगडफेक झाली. गाडीचे १५ हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणी व्यक्ती जखमी झाला नव्हता. सायंकाळी ६ वाजता एस.टी.महामंडळाची एम.एच.१४ बी.टी.१८२९ ही लालपरी नांदेडकडे येत असतांना त्यावर दगडफेक झाली आणि हल्लेखोर पळून गेले.

 

विशेष पोलीस महानिरिक्षक कार्यालयासमोर लालपरीवर हल्ला करून हल्लेखोरांनी दाखवलेली हिंमत नेस्तनाबुत करण्याची आवश्यकता आहे. १२ तासांच्या आत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एस.टी.महामंडळाच्या गाडीवर दगडफेक करण्याचा हा प्रकार निंदनीय आहे. सर्वसामान्य माणूस या एस.टी.बसचा मालक आहे. त्यांनी सुध्दा असे होत असतांना हल्लेखोरांचा विरोध करणे आवश्यक आहे. तरच लालपरींवर होणारे हल्ले रोखता येतील अशा भावना व्यक्त होत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.