सर्पराज्ञीत बीजतुला,वृक्षतुला आणि वन्यजीवांचे निसर्गार्पण

बिया पासून बनवलेल्या गळ्यातील हार,कर्णफुले, बाजूबंद ,कंबरपट्टा व पैंजण या सौंदर्य अलंकारांनी लक्ष वेधले

0

शिरूर कासार, रयतसाक्षी: वन्यजीवांचे माता-पिता म्हणून ओळख असलेले व प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे यांची एकुलती एक मुलगी सर्पराज्ञी सोनवणे हिच्या दहाव्या जन्मोत्सवानिमित्तानं सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र येथे एक आगळ्या-वेगळ्या कार्यक्रम आयोजन करण्यात आला . बीजतुला, वृक्षतुला व उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या वन्यजीवांचे निसर्गार्पण करण्यात आले. सर्पराज्ञीने घातलेल्या बीज अलंकाराने उपस्थित निसर्गप्रेमींचे लक्ष वेधले.

८० प्रजातीच्या वृक्षांची बीजतुला
या जन्मोत्सवाच्या कार्यक्रमात सर्पराज्ञी सोनवणेची बीजतुला करताना अनेक प्रकारच्या वृक्षबियांचा वापर करण्यात आला. यात सामान्यपणे आढळणार्‍या तसेच दुर्मिळ अति दुर्मिळ सोनसावर,कौशी,वायवर्ण,निर्मली,लाल हादगा,कोशिंब,बिबवा,काटेसावर,पांढरा पांगारा,पिवळा पळस,ताम्हण, तांबडा कुडा,आदीवृक्षांचा बियांचा वापर करण्यात आला.


दुर्मिळ अति दुर्मिळ वृक्षतुला
बीजतुले नंतर वृक्ष तुला करण्यात आली. यावेळी दुर्मिळ व अतिदुर्मिळ अश्या बोधिवृक्ष ,वायवर्ण,सोनसावर, कौशी, पिवळा पळस,पिवळी काटेसावर, अंबाडा, आदी वृक्षतुला करून सर्पराज्ञीच्या हस्ते बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले.
वन्यजीवांचे निसर्गार्पण
यावेळी सायंकाळी सर्पराज्ञीच्या हस्ते सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्रात उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्या व निसर्गात जगण्यास समर्थ असलेले उदमांजर,काळवीट व कोकिळेस निसर्गात सोडून देण्यात आले. यावेळी राजकुमार देशमुख वैद्यकीय अधिकारी बीड,सुभाष साळवे कृषी अधिकारी बीड, शिवप्रसाद जटाळे वित्त अधिकारी बीड, सचिन जाधव तालुका कृषी अधिकारी शिरूर, सुधाकर सोनवणे संपादक, आनंद जोशी, प्रकाश उजगरे, दीपक थोरात,मयूर थोरात, विनय इंगळे, रोहित बारी,डॉ.रवी कचरे,मयूर थोरात, राहुल कांबळे,दादासाहेब शिरोळे,आदित्य थोरात,वनरक्षक बद्रीनाथ परजने,यांच्यासह निसर्गप्रेमी उपस्थित होतेे

कार्यक्रमाचे आकर्षण
विविध प्रकारच्या फळापासून बनवतात होता सुंदर आकर्षक केक.

निसर्गार्पण केलेल्या काळवीट स्वतः कार्यक्रम स्थळी येऊन फळापासून बनवलेला केक खाला.

विविध वृक्षाच्या बिया पासून बनवलेला गळ्यातील हार, कानातील कर्णफुले ,कमरेचा कमरपट्टा ,पायातील पैंजण, या नैसर्गिक बीज अलंकाराने सर्पराज्ञीचे निसर्ग सौंदर्य खुलून दिसत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.