नांदेडमध्ये लालपरीवर पुन्हा हल्ला

२४ तासात तीन हल्ले; उस्माननगर हद्दीत बसवर दगडफेक

0

नांदेड, रयतसाक्षी: एसटी कर्मचारी संपामुळे विभागस्तरावर लालपरीची तुरकप्रमाणात वाहतुक सुरू करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात लालपरीला लक्ष केले जात असुन २४ तासांत तिन हल्ले झाले आहेत.

जिल्ह्यात गुरूवारी (दि.13 ) जानेवारी रोजी दोन एस.टी.बसेसवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दगडफेक करून त्यांचे नुकसान करण्यात आले. तसेच तिसरी बस पोलीस ठाणे उस्माननगरच्या हद्दीत फोडून समाजकंटकांनी एस.टी.चालू नये असा हा प्रयत्न केला.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार नांदेडहून देगलूरकडे जाणारी एस.टी.गाडी क्रमांक एम.एच.20 बी.एल.4104 ही पोलीस ठाणे उस्माननगरच्या हद्दीतून जात असतांना त्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली. याही गाडीत कोणाला मार लागला नाही. पण गाडीचे नुकसान झाले. गुरुवारी (दि.13) एकूण 3 एस.टी. गाड्यांवर दगडफेक करून त्यांना नुकसान करण्यात आले. हा प्रकार म्हणजे रस्त्यावर एस.टी. गाड्या चालू नयेत यासाठीच आहे.

सर्वसामान्य माणसाच्या सोयीसाठी धावणारी एस.टी.बंद करून हल्लेखोरांना आपली सुरु असलेली पैशांची आवक बंद होवू द्यायची नाही असाच त्या मागचा उद्देश दिसतो. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एस.टी.गाड्या फोडण्याच्या प्रश्नांवर अत्यंत गांभीर्याने विचार करून या समाजकंटकांना गजाआड करण्याची गरज व्यक्त होत आहे. याबाबत उस्माननगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.