इयत्ता ५ वी व ८ वीच्या शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ

पुरोगामी शिक्षक संघटनेच्या प्रयत्नाला यश

0

नांदेड, रयतसाक्षी: महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने इयत्ता 5 वी व 8 वी च्या शिष्यवृत्ती आवेदनपत्र भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी 6 जानेवारीला शिक्षण आयुक्त व परीक्षा विभाग व संचालक शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, यांच्याकडे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, राज्य सरचिटणीस हरिश ससनकर यांच्यावतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यात 31 जानेवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी होती.

आज परीक्षा विभागाने जारी केलेल्या सुचनेमध्ये सदर मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यभरातील वंचित विद्यार्थी या परिक्षांसाठी अर्ज करू शकणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील व राज्यातील अनेक विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित राहिले त्यामुळे मुदतवाढीची मागणी करावी अशी मागणी राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे, राज्य उपाध्यक्ष जी.एस.मंगनाळे यांनी पुरोगामी राज्य शाखेकडे केली होती त्या अनुषंगाने राज्य शाखेच्या वतीने राज्य शासनाकडे या मागणीचा पाठपुरावा करण्यात आला व आज ही मागणी मान्य झाली.

मुदतवाढ मिळाल्यामुळे राज्यभरातील वंचित विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे, या संधीचा लाभ घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परिक्षेसाठी आवेदन करावे असे आवाहन राज्य नेते विजय भोगेकर, राज्य महिला अध्यक्ष अल्का ठाकरे, राज्य कार्याध्यक्ष बळीराम मोरे, राज्य महिला सरचिटणीस शारदा वाडकर, प्रमुख संघटक भुपेश वाघ यांनी केले आहे.

जिल्हा शाखेच्यावतीने सविता बिरगे शिक्षणाधिकारी (प्रा.), बंडू आमदुरकर उपशिक्षणाधिकारी, शिष्यवृत्ती विभाग प्रमुख उत्तमराव पेटकर यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन राज्य कोषाध्यक्ष बालाजी पांडागळे राज्य उपाध्यक्ष जी.एस .मंगनाळे,जिल्हाध्यक्ष अशोक मोरे ,जिल्हा सरचिटणीस बाबुराव माडगे, दिले व मागणी रेटून धरली अखेर मागणीला जिल्हा शाखेच्या प्रयत्नाला यश आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.