वेतन प्रतीक्षेच्या अवघड घाटात एसटी चालकाच्या हातात व्यवसायाची स्टेरींग

तीन महिन्यापासून पगार नाही! हिंगोली आगारातील एसटी चालकाने थाटला मास्क विक्रीचा व्यवसाय, आंदोलनामुळे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यावर मास्क, भाजीपाला विक्रीची वेळ

0

हिंगोली रयतसाक्षी: एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार झाले नसल्यामुळे एसटी कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी वेगळा मार्ग अवलंबून उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध केले आहे.

 

हिंगोली आगारातील चालक पदावर कार्यरत असलेले सुभाष दत्तराव पोले यांनी बसस्थानकापासून काही अंतरावर फुटपाथवर मास्क विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. एसटी चालक पोले यांनी घरातील हरभरे विकून हाती आलेल्या पैशातून हा व्यवसाय थाटल्याचे पोले यांनी आज (दि.१५) जानेवारी रोजी सांगितले.

अशा बिकट परिस्थितीत दैनंदिन खर्च व मुला बाळांचे शिक्षण कसं करावं असा गंभीर प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. सर्वच एसटी कर्मचाऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असतानाही प्रशासनाने अद्याप तोडगा काढला नाही. त्यामुळे आंदोलनावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी हिंगोली आगारातील कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.