मालमत्ता दस्तवर हेराफेरी कारणांवर कठोर कारवाईची मागणी

धर्माबाद नगरषदेतील प्रकार : अर्थीक हव्यासापायी कर्मचार्यांचे कर्तव्यकांड, माहिती अधिकारतुन मालमत्तेचे नावपरीवर्तनाचे पितळ उघडे

0

रयतसाक्षी, धर्माबाद: येथील नगरपरीषदेतील तात्कालीन नावपरीवर्तन विभागप्रमुख व तात्कालीन कार्यालयीन अधीक्षकांनी संबधिताशी आर्थिक तडजोड करून वारसाहक्कात दोन बहीणी असूनही एका बहीणीचे संमती पत्र न घेताच, लाखों रुपय किंमतीची मालमत्ता नियमबाह्य पद्धतीने दुसऱ्या बहीणीच्या नावावर केल्याचे प्रकरण माहितीच्या अधिकारात उघडकीस आले.

संबधित दोषीं असलेल्या कर्मचाऱ्यांना तुरुंगात जाण्याची वेळ आली असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत आहे. परंतु सदरील प्रकरणाकडे मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शहरातील जनतेत उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे यांच्याकडे सौ.अरूणा बालाजी शंकरवार यांनी केल्यामुळे दोषी कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, धर्माबाद नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील काही दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर गावठाण प्रमाणपत्र,दाटवस्ती प्रमाणपत्र व मालकी हक्क प्रमाणपत्र निर्गमित करून मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे दस्तनोंदणी करण्यात आल्यामुळे सदरील प्रकरणात पालिकेतील दोषी कर्मचारी व काही दलालांनी आपले चांगभले करून घेतले होते.

सदरील प्रमाणपत्रावर तात्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याचे उघडकीस आले होते.तसेच पालिकेतील रिव्हीजन रजीस्टरवर खाडाखोड करून त्या जागेवर वाईटनर लावण्यात आल्यामुळे सदरील प्रकरणात पालिकेतील दोषी असलेल्या पाच कर्मचाऱ्यांना तुरुंगाची हवा खावावी लागली होती.

सदरील प्रकरणामुळे पालिकेचे नाव धुळीस मिळाले असून सदरील प्रकरणामुळे मालमत्ता धारकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.सदरील प्रकरण ताजे असताना, आणखीन एक प्रकरण माहितीच्या अधिकारात उघडकीस आल्यामुळे पुन्हा शहरातील मालमत्ता धारकांत घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहरातील देव्वी गल्ली येथील मालमत्ता क्रमांक (२- ५६५) एकूण क्षेत्रफळ ५०. २१ चौ.मी. मोकळी जागा हि गंगव्वा नरसय्या यांच्या नावावर होती.सदरील महीलेचा मुत्यु दि.२० जुलै २०११रोजी झाला आहे.मयत महीलेस बंटूवार मलव्वा भ्र.गंगाधर व अरूणा बालाजी शंकरवार या दोन मुली असून त्या वारसदार आहेत.त्यांच्याकडे पोलिस पाटील यांनी दिलेले वारसा प्रमाणपत्र सुध्दा उपलब्ध आहे.

त्या दोन मुली पैकी श्रीमती मलव्वा गंगाधर बंटूवार यांनी सदरील मालमत्ता नावपरीवर्तन करण्यासाठी दि.१८ जुलै ‌२०१९ रोजी नगरपरीषदेत अर्ज दिला आहे. सदरील मालमत्तेचे नावपरीवर्तन करण्यासाठी दि.२३ जुलै २०१९ रोजी जाहीरनामा काढण्यात आला आहे.त्यांनंतर तात्कालीन नावपरीवर्तन विभागप्रमुखांनी सदरील संचिकेतील कागदपत्रांची पाहणी करूनच पुढील प्रक्रिया पूर्ण करावे,असे असताना सुध्दा तात्कालीन नावपरीवर्तन विभागप्रमुखांनी सदरील फाईलवर टिप्पणी टाकून तात्कालीन कार्यालयीन अधीक्षक यांच्याकडे पाठवले.

सदरील फाईलवर कार्यालयीन अधीक्षकांनी विभाग प्रमुखांच्या टिप्पणीला अनुसरून संबधितांकडून २२५९ रुपय मालमत्ता हस्तांतरण फिस वसूल करून नावपरीवर्तन करणे योग्य राहील.अशी टिप्पणी टाकली आहे.संबधित विभाग प्रमुख व कार्यालयीन अधीक्षकांची सदरील फाईलवरील टिप्पणी पाहून मुख्याधिकारी स्वाक्षरी करीत असतात.परंतु सदरील प्रकरणातील नावपरीवर्तन करण्यासाठी जोडलेल्या कागदपत्रात पोलिस पाटील यांचा वारसाहक्क प्रमाणपत्र सुध्दा जोडलेला आहे.

परंतु मयत महीलेचे दोन वारस असताना सुध्दा सदरील मालमत्ता नावपरीवर्तन करीत असताना दुसऱ्या वारसाचे संमती पत्र घेणे बंधनकारक आहे.परंतु संमती न घेताच,सदरील मालमत्ता मलव्वा गंगाधर बंटूवार यांच्या नावावर करण्यात आले आहे. सदरील नियमबाह्य पद्धतीने मालमत्तेचे नावपरीवर्तन करून संबंधित कर्मचाऱ्यांनी आपले चांगभले करून घेतले असल्याची चर्चा शहरातील जनतेत होत होती.त्यामुळे सदरील प्ररकरणाची सत्यता जाणून घेण्यासाठी अरूणा बालाजी शंकरवार यांनी माहीतीच्या अधिकारात काढलेल्या कागदपत्रांरून उघडकीस आले आहे.

नियमबाह्य पद्धतीने मालमत्तेचे नावपरीवर्तन करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्याची लेखी मागणी अरुणा बालाजी शंकरवार यांनी मुख्याधिकारी श्रीमती निलम कांबळे, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, पोलिस निरीक्षक संजय हिबारे, उपविभागीय पोलिस अधिकारी, धर्माबाद यांच्याकडे केली आहे. सदरील प्रकरणात दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर व प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे काय कार्यवाही करतील,याकडे शहरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.