पत्नीच्या नैराश्येतून पतीची गळफास घेऊन आत्महत्या

पत्नी नांदायला येत नसल्याच्याने पुसेगाव शिवारात युवक‌ पतीने उचलले टोकाचे पाऊल

0

रयतसाक्षी, हिंगोली : पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्यातून सेनगाव तालुक्यातील पुसेगाव (ता. सेनगाव) शिवारात एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची रविवारी (दि.१६) उघडकीस आली . नरसी नामदेव पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पुसेगाव येथील मयत मंगेश परशुराम खंदारे वय(२३वर्ष) ची पत्नी नांदण्यासाठी येत नसल्याच्या नैराश्यातून मंगेश खंदारे यांनी पुसेगाव शिवारात नायलॉन घ्या दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवारी (दि.२३)सकाळी मंगेश खंदारे यांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

याप्रकरणी परशुराम खंदारे यांच्या खबरीवरुन खबरीवरून नरसी नामदेव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरसी नामदेव पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पोटे पुढील तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.