जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ शिक्षक सेनेचा आंदोलनाचा इशारा

जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात अफरातफरीचा आरोप ; चौकशीची मागणी

0

रयतसाक्षी, नांदेड : जिल्हा परिषद वित्त विभागामध्ये जीपीएफ स्लीपामध्ये फेरबदल करुन वर्ष अखेर रक्तात हजारो रुपयांच्या वर केल्याचा आरोप शिक्षक सेनेने केला आहे. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारच्या कार्याची चौकशी मागणीसाठी शिक्षक सेना संघटनेच्या वतिने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे .

जिल्हा परिषद वित्त विभाग म्हणजे गैरव्यवहाराचा भोवरा असे म्हणणे वावगे ठरणार नाही. शिक्षक‌कर्मचा-यांच्या नियमीत प्रशासकीय कामकाजामध्ये अपरातफर‌करण्यासह चिमीरी आडून लाखोंचा भ्रष्टाचार इथल्या अस्थापनेला नवा नाही, जीपीएफ स्लीपमध्ये आकडे शुन्य करणे , मार्च अखेर रक्कम मध्ये हजारो रुपयांची तफावत करणे , तफावत रक्कम निधी कुठे गेला ? कोणी गडप केला ? शेड्यूल्ड आडून दोन दोन वर्ष शिक्षक बांधवाना वेठीस धरले , शेड्यूल्ड कोणी खाल्ले ? का गायब झाले ? शिक्षक करमचा-यांची आर्थिक कोंडी का केली ? असे अनेक प्रश्न उद्भवत आहेत. दरम्यान, एकाच केंद्रात असलेले शिक्षकांचे हफ्ते जमा होतात तर काहींचे होत नाहीत.

या शिवाय एकाच शाळेत असलेल्या शिक्षकांचा ही तोच प्रकार आहे. जमा करण्यासाठी शेड्यूल्ड एकच असते . याही पलिकडे सातव्या वेतन आयोगाचे हफ्ते काही तालुक्यात जमा तर काही तालुक्यात जमाच नाही , निधी असताना ही जमा नाही , हा निधी कुठे गेला ? निधी असुनही का जमा केले नाहीत ? यास कोण जबाबदार आहेत ? याचा जाब प्रशासनाला द्यावा लागणार आहे.

सहाव्या वेतन आयोगाच्या हफ्त्यांचा तर कहर केला आहे . सहाव्या वेतन आयोगाचे हफ्त्यां बाबत तालुकास्तरावर कँप घेऊनही काय साध्य झाले ? कागदपत्रे कितीही वेळा दिले तरी प्रशासनाच ठरलेलंच जीपीएफ स्लीप अपुर्णच. प्रशासनाचा इतका हलगर्जीपणा का ? या मागचे षडयंत्र काय ? यास कोण कोण जबाबदार आहेत ? या दरसाल होणार्या प्रकारामागचा करविता धनी कोन ? या प्रकरणी चौकशी मागणीचे निवेदन देऊनही पंधरवडा लोटला अद्याप प्रशासनाने झोपेचे सोंग घेतले आहे.
प्रशासनाच्या निष्क्रियतेचा संताप व गैरव्यवहाराच्या चौकशी मागणीसाठी दि.२१ जानेवारी आंदोलनाद्वारे निषेध करण्यात येणार आहे. आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, विठ्ठलराव देशटवाड , श्रीरंग बिरादार , रवि बःडेवार गंगाधर कदम , गंगाधर ढवळे , अविनाश चिद्रावार , संजय मोरे , गोविंद आलेटवाड , सुर्यवंशी मॕडम , बस्वराज मठवाले , बाजगीरे सर यांनी केले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.