बीडमध्ये मेस्टाचा इशारा फोल; पालकांचेच ‘स्कूल चले हम’, औरंगाबादेत शाळा बंदच

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “स्कूल चले हम...’ आंदोलन करण्यात आले.

0

रयतसाक्षी, बीड-औरंगाबाद : कोरोना निर्बंधांमध्ये सर्वकाही मर्यादित प्रमाणात सुरू असताना शाळाही सुरू करण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सततच्या शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिकतेवर परिणाम होत असून राज्य शासनाने नियमांचे पालन करून शाळा सुरू कराव्यात, या मागणीसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “स्कूल चले हम…’ आंदोलन करण्यात आले.

सततच्या शाळा बंदमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ते टाळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा शाळा सुरू कराव्यात या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्कूल चले हम आंदोलन करण्यात आले. त्यात सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते

शाळांविषयी मंत्रिमडळ बैठकीत चर्चा : टोपे
इंग्रजी शाळांची संघटना ‘मेस्टा’ ने शाळा उघडण्याबाबत घेतलेला निर्णय तूर्तास मागे घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले असून शाळा उघडण्याबाबत येत्या बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होईल. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना याबाबत माहिती दिली जाईल. शाळा उघडण्याविषयी राज्य सरकारची भूमिकाही सकारात्मक असल्याचे ते म्हणाले.

मेस्टाचा इशारा फाेल : औरंगाबादेत शाळा बंदच
औरंगाबाद | शासनाने निर्बंध मागे घ्यावेत, अन्यथा १७ जानेवारीपासून इंग्रजी शाळा सुरू करू, असा इशारा महाराष्ट्र इंग्रजी स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (मेस्टा) दिला हाेता. मात्र औरंगाबादमध्ये एकाही संस्थेने प्रतिसाद न दिल्याने एकही शाळा सुरू हाेऊ शकली नाही. ग्रामीण भागात मात्र १५९ शाळा सुरू झाल्याचा दावा संघटनेचे अध्यक्ष संजय तायडे यांनी केला. पण शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी ताे खाेडून काढत अशी काेणतीही माहिती आमच्याकडे नसल्याचे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.