गेवराई तालुक्यात प्रेमीयुगुलाचा सोबत गळफास

दोर तुटल्याने विवाहिता वाचली; फेसबुकवरून जुळले होते प्रेम, कल्याणहून आली भेटायला

0

रयतसाक्षी, गेवराई: तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवरून प्रेम जुळून आलेल्या २७ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना भेंड बुद्रुक (ता. गेवराई) येथे सोमवार (दि. १७) रोजी पहाटे घडली. जयपाल लक्ष्मण वाव्हळ (२७, रा.भेंड बुद्रुक, ता. गेवराई) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

या युवकाचे कल्याण येथील तीस वर्षीय विवाहित महिलेसोबत फेसबुकवरून प्रेम जुळून आले. दोन दिवसांपूर्वीच ही विवाहित महिला कल्याण येथून भेंड बुद्रुक येथे आली. रविवारी (दि.१६) रोजी महिलेला पतीने फोन करून गुन्हा दाखल करील, असे बजावले असता भीतीपोटी रविवारी मध्यरात्र ते सोमवारी पहाटे दरम्यान घरातील आडुला गळफास घेतला.

 

यावेळी विवाहित महिलेचा दोर तुटला. मात्र जयपाल वाव्हळ याचा यात मृत्यू झाला. याबाबत तलवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि प्रताप नलघरे यांच्या मार्गदर्शनाखाली एम.डी.कुवारे पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.