कोरोना : सावधान बीड शंभरी पार , बाधीतांमध्ये नऊ बालकांचा समावेश

जिल्ह्यात एकून १४४ बाधीत, परळी सर्वाधिक २६ बाधित

0

रयतसाक्षी: बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून आज प्राप्त अहवाला नुसार एकून १४४ बाधितांमध्ये १८ वर्षांखालील ९ बालकांचा समावेश आहे. कोरोनाची गती वाढत असल्याने नागरिकांनी खबरदारी बाळगण्याची गरज आहे.

जिल्ह्यात गेल्या आठ दिवसापासून कोरोना बाधितांचे प्रमाण वाढले आहे. आज प्रप्त अहवालानुसार कोरोना बाधितांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. आज आलेल्या अहवालामध्ये 144 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये 18 वर्षाखालील 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बीड कोरोना पॉझिटिव्ह अंबाजोगाई 19, आष्टी 16, बीड 37, धारूर 10, गेवराई 7, केज 3, माजलगाव 15, परळी 26, पाटोदा 10,आणि वडवणी 1
अशी बाधितांची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.