दरोड्याच्या तयारीतील टोळी सशस्र अटक

पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांची धाडसी कारवाई; आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

0

रयतसाक्षी: केज-कळंब रोड वरील येथील विठाई पूरम जवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या सशत्र दरोडेखोरांची टोळी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शस्त्रासह पकडली. केज-कळंब रोडवरील विठाईपुरम जवळ दरोड्याच्या तयारीत अंधारात दबा धरून बसलेल्या पाच सशस्त्र दरोडेखोरांची टोळी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी हा त्याना शास्त्रासह ताब्यात घेतले.

या बाबतची माहिती अशी की, दि. १८ जानेवारी रोजी केज पोलिसांच्या गस्ती पथकातील पोलीस नाईक दिलीप गित्ते, बाबासाहेब बांगर, रामदास तांदळे, शेख आणि वाहन चालक हनुमंत गायकवाड हे सरकारी वाहनाने गस्त घालीत असताना त्यांना केज-कळंब रोडवरील विठाई पुरम जवळील पुलावर एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार क्र (एमएच-०५/ इएस- ९५८५) व तिच्या शेजारी तोंडावर काळे बुरखे घातलेले दोन इसम हे संशयास्पदरित्या आढळून आले. गस्ती पथकातील कर्मचाऱ्यांना पहाताच ते दोघे आणि गाडीतील तीन इसम हे पळून जाऊ लागले. हा प्रकार पहाताच पोलीस पथकाने त्यांचा पाठलाग सुरू केला आणि त्यांना पकडले. त्यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत व सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांना माहिती देऊन त्यांनी सोबत आणलेल्या गाडीची झडती घेतली असता त्यांच्याकडे चाकू, सुरा, लोखंडी रॉड, कुऱ्हाड, फायटर या शस्त्रात्रासह स्क्रू ड्रायव्हर, पाना आदी साहित्य जप्त करण्यात आले.

या कार्यवाहीत सहाय्यक जिल्हा पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि साहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक सिमाली कोळी, पोलीस नाईक दिलीप गित्ते, बाबासाहेब बांगर, रामदास तांदळे, शेख, शेषेराव यादव, युवराज भुंबे आणि वाहन चालक हनुमंत गायकवाड यांनी ही कार्यवाही केली.
पोलीस नाईक दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून दरोड्याचा तयारीत असलेल्यावे कैलास सखाराम पवार, वय २८ वर्ष (रा. लिंबा ता. पाथरी जि. परभणी), संतोष कोंडीराम सोनटक्के, वय २५ वर्ष (रा. गुंज (खु.) ता.पाथरी जि. परभणी), परमेश्वर सखाराम पवार, वय २० वर्ष (रा. लिंबा ता. पाथरी जि. परभणी), राहुल बालासाहेब कांबळे, वय २३ वर्ष (रा.गुंज (खु.) ता. पाथरी जि. परभणी), सुशिल मारोती चव्हाण, वय २० वर्ष (रा. पिट बाभळगाव ता. पाथरी जि. परभणी) या पाच आरोपी विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११/२०२२ भा.दं.वि. ३९९ आणि शस्त्रास्त्र प्रतिबंधक कायदा कलम ४ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे हे तपास करीत आहेत.

आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

आरोपींना केज न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने पाचही आरोपींना दि. २१ जानेवारी पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि बाबासाहेब बांगर यांनी जीव धोक्यात घालून केली कार्यवाही

या गुन्ह्यातील आरोपी यांच्याकडे घातक शस्त्र असतानाही पोलीस नाईक दिलीप गित्ते आणि बाबासाहेब बांगर यांनी जीव धोक्यात घालून दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना बेड्या ठोकल्या.पंधरा दिवसा पूर्वीही विठाईपुरम जवळील शिवाजी

नगर व शेतवस्तीवर झाली होती चोरी :- ३१ डिसेंबर २०२१ रोजी मध्यरात्री केज-कळंब रोडवरील विठाई पुरम च्या शेजारी असलेल्या शिवाजी नगर येथे भगवान जमाले आणि गुंड यांच्या येथे घरातील लोकांना मारहाण करून चोरी झाली होती. त्यात भगवान जमाले यांच्या पत्नी सौ. सरस्वती जमाले आणि अशोक गुंड हे जखमी झाले होते. यात चोरांनी सोन्याचे दागिने आणि नगदी रक्कम असा एकूण ८४ हजार रु. चा ऐवज घेऊन पोबारा केला होता.

या टोळीकडून पोलिसांनी एक स्विफ्ट कार, दोन लोखंडी पहारी, पाच मोबाईल, दोन सुरे, एक फायटर, एक कुऱ्हाड, एक ऍडजस्टेबल पाना, एक स्क्रू ड्रायव्हर हे साहित्य जप्त केले आहे.

 

केज-कळंब रोडवर अंधारात दबा धरून बसलेल्या दरोड्याचा तयारीत असलेली सशस्त्र दरोडेखोरांची टोळी केज पोलिसांनी सहाय्यक पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रासह पकडली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.