…त्या आरोपीकडून तीन जबरी चोरीच्या घटना उघडकीस

आंबाचोंडी येथे बंदुकीच्या धाकावर बँक लुटण्याचा प्रयत्न करणारे आरोपी

0

रयतसाक्षी, हिंगोली : वसमत तालुक्यातील आंबाचोंडी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेवर अज्ञात तीन बंदुकधारी दरोडेखोरांनी गोळीबार करून बँक लुटण्याचा प्रयत्न केला होता. या बँक लुटणाऱ्या आरोपीकडून इतर तीन जबरी चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अशी माहिती आज दिनांक 19 जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पोलिसांच्या पथकाने या तिन्ही दरोडेखोरांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता या घटनेतील आरोपी अयाज अहमद मोहम्मद गफूर, शाबान जमील अहमद अन्सारी, तसेच शिग्रसेन उर्फ संदीप मटरू यादव या तिघांनी कुरुंदा अंतर्गत येणाऱ्या रितेश पेट्रोल पंप येथे बंदुकीचा धाक दाखवून जबरीने पैसे चोरून नेल्याचे सांगितले. तसेच वसमत शहरामध्ये गॅस एजन्सीचे मॅनेजर यांची पैशाची बँक तसेच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे सुद्धा बंदुकीचा धाक दाखवून पैशाची बॅग हिसकावल्याचे सांगितले.

या आरोपीकडून असे इतर गुन्हे उघड झाले असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल, 12 जिवंत काडतूस, बाराबोरचे 9 काडतूस तसेच मोटरसायकल 2 खंजीर असा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक बालाजी पुंड, नितीन केनेकर, शिवसांब घेवारे, तसेच कुरुंदा, आखाडा बाळापुर व स्थानिक गुन्हे शाखेच्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.