पंकज कुमावत यांची दबंग कारवाई : १७ चंदन तस्करांच्या मुसक्या आवळल्या

गेवराई तालुक्यात उक्कडपिंप्री शिवारात छापा , ९ लाखाचा मुद्देमाल जप्त

0

रयतसाक्षी,गेवराई : चंदनाची झाडे तोडून त्याची तस्करी करणार्‍यां चंदनतस्करांनी गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी शिवारात साठा करुन ठेवल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना मिळाली. त्यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.21) गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील शेतात छापा मारला असता यावेळी १७ चंदन तस्कर आढळून आले. त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ७ लाख ८७ हजाराचे चंदन, दुचाकी असा 9 लाख मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वीस जणांवर चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंदन तस्करांवरील या कारवाईने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

गेवराई तालुक्यातील उक्कड पिंपरी येथील एकजन बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायद्यासाठी काहींना सोबत घेवून परिसरातील चंदन तस्करी करत आहे. तसेच मोरवाड येथील स्वतःच्या शेतामध्ये पत्र्याच्यामध्ये चंदनाचा गाबा काढून पांढर्‍या पोत्यांमध्ये भरून ठेवलेला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावात यांना मिळाली. पोलीस अधीक्षक आर. राजा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे व त्यांच्या टिमने शुक्रवारी छापा मारला. यावेळी १७ इसम जागीच मिळून आले. त्यांच्या ताब्यातील पत्र्याचे शेडची व परिसराची पंचासमक्ष झडती घेतली.

गेवराई येथून पांढर्‍या १६ पोत्यामध्ये ३२८ किलो चंदनाच्या झाडाच्या खोडामधून काढलेला चंदनाचा गाबा अंदाजे किंमत ७ लाख ८७ हजार, चार दुचाकी, मोबाईल, चंदन तोडण्यासाठी लागणारे साहित्य असा ९ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पकडलेले १७ आरोपी व फरार तीन अशा वीस जणांवर स. पो. नि. संतोष मिसळे यांच्या फिर्यादीवरुन चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी सहाय्यक फौजदार शफी इनामदार, पोह. बालाजी दराडे, बाबासाहेब बांगर, पोना राजू वंजारे, महादेव सातपुते, संजय टुले यांचा कारवाईत सहभाग होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.