डिटोनेटर स्फोट‌ प्रकरणात आणखी चार आरोपींना पोलीस कोठडी

चार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

0

रयतसाक्षी, नांदेड:शांतीनगर भागात झालेला डिटोनेटर स्फोट प्रकरणात उमरखेड तालुक्यातील ढाकणी एक आणि हिमायतनगर येथील तीन अशा चार नवीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्रविण कुलकर्णी यांनी या नवीन चार जणांना 23 जानेवारी 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीनगर भागात 8 जानेवारी रोजी एक स्फोट झाला. तो स्फोट डिटोनेटर प्रकाराचा होता. याबाबत इतवारा पोलीस ठाण्यात ज्या घरात डिटोनेटर सापडले आणि त्या डिटोनेटरला तपासण्यात जखमी झालेल्या दिपक दिगंबर धोंगडे (24) आणि त्याचा नातलग केशव शिवाजी पवार (41) ज्याने हे डिटोनेटर आणून धोंगडेच्या घरात ठेवले होते अशा दोघांना अटक झाली.

आज या गुन्ह्याचे तपासीक अंमलदार पोलीस उपनिरिक्षक शेख असद यांनी बळीराम रामा नरवाडे (40) व्यवसाय ब्लॉस्टींग रा.ढाणकी ता.उमरखेड जि.यवतमाळ, साहेबराव फकीरा चव्हाण (43) व्यवसाय दगडफोडने रा.जनता कॉलनी हिमायतनगर जि.नांदेड, राजू बाबू यमलवाड(20) व्यवसाय दगडफोडने रा.वाळकेवाडी ता.हिमायतनगर जि.नांदेड, बाबूलाल हिरामणी पटेल (41) व्यवसाय व्यवस्थापक के्रेशर मशीन खडकी ता.हिमायतनगर जि.नांदेड या चार जणांना पकडून आज न्यायालयासमक्ष हजर केले.

आपल्या अभिलेखात पोलीस सांगतात सदर डिटोनेटर केशव पवार यांच्याकडे जाणिव पुर्वक कोणता उद्देश ठेवून दिले आहे याचा तपास करणे आहे. डिटोनेटरचा कांही मोठा साठा कोठे ठेवला आहे काय? आणि त्यांचे इतर कोणी साथीदार आहेत काय? याचा शोध घेणे आहे असा युक्तीवाद मांडला. युक्तीवाद ऐकून न्या.कुलकर्णी यांनी या चार जणांना 23 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.