हिंगोली जिल्ह्यात खळबळ :पती-पत्नीच्या नात्याला काळीमा पतीच्या संमतीने मित्राचा विवाहितेवर अत्याचार

पिडीतेची पोलीसात धाव

0

रयतसाक्षी, हिंगोली : जिल्ह्यातील सवड येथे एका विवाहितेवर दि. १९ जानेवारी रोजी पतीच्या मित्रांने चाकुचा धाक दाखवून अत्याचार केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पतीनेच नराधम मित्रास हे अमानवी कृत्य करण्यास प्रवृत्त केल्याचे पिडीतेने फिर्यादीत नमुद केल्याने पतीसह मित्रावर हिंगोली ग्रामीण पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील सवड येथील एका नराधम पतीने स्वतःच्या पत्नीवर अत्याचारासाठी मित्रास प्रव्रत्त करत रात्रीच्या वेळी पत्नी एकटी घरात असल्याचा गैरफायदा घेऊन स्वतः: दारात बसून मित्राला घरात पाठवले . नराधम मित्राने विवाहितेवर चाकूचा धाक दाखवत तिला जिवे मारण्याची धमकी देत असाह्य विवाहितेवर अत्याचार केला .

पती- पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी हि घटना दि. १९ जानेवारी रोजी घडली . घटनेचा प्रत्यक्षदर्शी पतीने विवाहितेचस चारीत्र्यावर संशय घेत तिचा शारीरिक व माणसीक छळ केला . दरम्यान या पूर्वीही चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पिडीतेचा शारीरिक व माणसीक छळ केला आहे.

पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरुन हिंगोली ग्रामीण पोलीसात तिच्या पतीसह त्याचा मित्र माधव जोगदंड याच्या विरोधात आत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास हिंगोली ग्रामीण पोलीस करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.