धर्माबाद रेल्वे स्थानकावर विधवा महीलेवर अत्याचार, दोन जण अटकेत

घटनेच्या पश्चात तत्काळ आरोपींच्या अटकेमुळे रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे

0

धर्माबाद, रयतसाक्षी: येथील रेल्वे स्थानकावर शुक्रवारी मध्यरात्री एकटी महीला असलेली पाहून तिच्यावर अत्याचार करून तिच्याकडील रोख रक्कम हिसकावून घेण्यात आले होते.सदरील घटनेची तक्रार रेल्वे पोलिसांकडे येताच, रेल्वे पोलिसांनी धर्माबाद येथील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज वरून दोन आरोपींना अटक केले आहे . घटनेच्या पश्चात तत्काळ आरोपींच्या अटकेमुळे रेल्वे पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. पिडीत महिला हि नायगाव बाजार येथील रहिवासी आहे .

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी मराठवाडा एक्स्प्रेसने नांदेडहून एक विधवा महीला धर्माबाद येथे रात्री रेल्वेचा प्रवास करून अंदाजित रात्री बाराच्या सुमारास आली . रात्रीची वेळ असल्याने रेल्वे स्थानकावरच थांबली. धर्माबाद रेल्वे स्थानकावर एकटीच महीला असल्याचा गैरफायदा घेऊन तालुक्यातील विळेगाव ( ध) येथील आरोपी भिमराव बाबुराव सर्जे वय ३५ वर्ष व उमरी येथील व्यंकटेश नगर येथील अक्षय धोंडिबा क्षीरसागर यांनी पिडीत महीलेस रेल्वे स्थानकाच्या बाजूला अंधारात नेऊन तिच्यावर अत्याचार केला .

शिवाय तिच्याजवळील रोख रक्कम घेऊन पसार झाले होते. पिडीत महीला ही रात्रभर रेल्वे स्थानकावरच थांबून शुक्रवारी सकाळी धर्माबाद येथूनच सकाळी चार वाजता मराठवाडा एक्स्प्रेसने नांदेडला आली.

दरम्यान धर्माबाद रेल्वे स्थानकावर रात्री घडलेली आपबिती नांदेड रेल्वे पोलिसांकडे सांगितली . तात्काळ रेल्वे पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून धर्माबाद येथील रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजवरून काही तासातच वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. घटनेची दखल नांदेडचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी घेतली आहे.

शनिवारी दुपारी धर्माबाद रेल्वे स्थानकास भेट देऊन पुढील तपास करण्याच्या सूचना रेल्वे पोलिसांना दिल्या. विधवा पिडीतेवरील अत्याचार घटनेची सर्वत्र वा-यासारखी पसरली आणि एकच खळबळ उडाली. काही वेळातच नागरिकांनी रेल्वे स्थानकावर गर्दी केली. पिडीत विधवा महीलेवर अत्याचार करून तिच्याजवळील रोख रक्कम घेऊन पसार झालेल्या दोन्ही आरोपींना नांदेडचे लोहमार्ग पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे पोलिसांनी अटक केल्याने रेल्वे पोलीसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.