भारतीय बौद्ध महासभा कार्यकारिणी निवड.

तालुका अध्यक्षपदी सदानंद देवके तर सचिव पदी धडेकर गंगाधर यांची निवड.

0

धर्माबाद, रयतसाक्षी: : भारतीय बौद्ध महासभा धर्माबाद तालुका शाखेचा कार्यकाळ संपल्यामुळे नुतन कार्यकारिणी निवडीसाठी
दि:२२ जानेवारी २०२२ रोजी शनिवारी शासकीय विश्रामगृह धर्माबाद येथे दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा नांदेड उत्तर च्या वतिने जिल्हा शाखाचे कोषाध्यक्ष सा.ना. भालेराव, संस्कार उपाध्यक्ष जाधव ए.एस , संस्कार सचिव अध्यक्ष अप्पाराव येरेकर , भोकर तालुका सरचिटणीस सोनकांबळे बी.पी , कोषाध्यक्ष पि.जी.शहाणे तालुका अध्यक्षपदी सदानंद देवके यांच्या प्रमुख उपस्थितीत महाकारुणीक भगवान गौतम बुद्ध, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून निवड प्रक्रिया करण्यात आली.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्षपदी सदानंद देवके सचिवपदी धडेकर गंगाधर तर कोषाध्यक्ष सुभाष का़बळे यांची एकमताने निवड करण्यात आली.

पुढील तालुका कार्यकारणी निवड संस्कार उपाध्यक्ष: माधवराव विठ्ठल कांगठीकर , संरक्षण उपाध्यक्ष: गणेश वाघमारे,पर्यटन उपाध्यक्ष: चंद्रकांत नागोराव देवके, महिला उपाध्यक्ष: सौ.उज्वला चौंदते, संरक्षण सचिव गंगाधर गायकवाड, राजेश सोनकांबळे,पर्यटन सचिव संजय कदम, गंगाप्रसाद सोनकांबळे , संस्कार सचिव नारायण सोनटक्के, भिमराव वाघमारे , कार्यालयीन सचिव मनोहर लोकडे, हिशोब तपासणीस: माधव शेळके, तर संघटक: गंगाधर डोंगरे, बालाजी घायाळ जारिकोट,नागेश कांबळे ,सुधाकर वाघमारे येताळा यांची निवड करण्यात आली.

यावेळी अनेक प्रतिष्ठित व्यक्तीने नुतन कार्यकारिणीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी वंचितचे सल्लागार जे.के.जोंधळे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष जी.पी.मिसाळे, वंचित तालुका अध्यक्ष एकनाथ जिंकले, सचिव गौतम देवके, शंकरराव वाघमारे बन्नाळीकर,बौध्दाचार्य शिध्दार्थ वाघमारे,सि.एन.वाघमारे, शंकर सोनटक्के,संजय बगारे , सुदर्शन वाघमारे, भगवान कांबळे ,केरबा वाघमारे , चंद्रकांत वाघमारे बन्नाळीकर ,विजय काळे ,सुरेश देवे , शंकर लोकडे, जनार्दन लोकडे, शेषराव धावणे, यांच्या सह आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.